तरुण भारत

भारताच्या डिजिटल उपक्रमांची जगभरात चर्चा

डिजिटल इंडियाला 6 वर्षे पूर्ण

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिजिटल इंडिया योजनेला 6 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त याच्या लाभार्थ्यांशी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे संवाद साधला आहे. डिजिटल इंडिया म्हणजे सर्वांना संधी, सर्वांना सुविधा आणि सर्वांची भागीदारी आहे. डिजिटल इंडिया म्हणजे शासकीय व्यवस्था सर्वांपर्यंत पोहोचणे आहे. कोरोनाकाळात भारताने तयार केलेल्या डिजिटल सोल्युशन्सची आज जगभरात चर्चा होत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 

एका आरोग्य सेतू ऍपद्वारे कोरोना संक्रमण रोखण्यास मोठी मदत मिळाली आहे. लसीकरणासाठी भारताच्या कोविन ऍपमध्येही अनेक देशांनी स्वारस्य दाखविले आहे. लसीकरणाच्या प्रक्रियेसाठी असे मॉनिटरिंग टूल असणे हा आमच्या तांत्रिक कुशलतेचा पुरावा असल्याचे मोदी म्हणाले.

लोकांना सुविधा

वाहन चालविण्याचा परवाना, जन्म प्रमाणपत्र, विजेचे बिल भरणे, पाण्याचे बिल भरणे, इन्कम टॅक्स रिटर्न भरणे अशाप्रकारच्या अनेक कामांसाठीच्या प्रक्रिया आता डिजिटल इंडियाच्या मदतीने अत्यंत सोप्या आणि वेगवान झाल्या आहेत. गावांमध्ये देखील डिजिटल इंडिया मोहिमेने वेग पकडला असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

डिजिटल इंडिया भारताचा संकल्प देशात आज एकीकडे नवोन्मेषाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे नवोन्मेष वेगाने स्वीकारण्याची वृत्ती देखील आहे. याचमुळे डिजिटल इंडिया भारताचा संकल्प आहे. डिजिटल इंडिया आत्मनिर्भर भारताची साधना आहे. डिजिटल इंडिया 21 व्या शतकात सशक्त होत असलेल्या भारताचा जयघोष असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.

Related Stories

देशात दिवसभरात आणखी तिघांचा मृत्यू

tarunbharat

राज्याभिषेक सोहळा ऐकताना, त्याबद्दल लिहिताना अंगावर काटा उभा राहतो – जयंत पाटील

triratna

केजरीवालांविरोधात भाजपकडून लढणार सुनील यादव

prashant_c

नेपाळ उभारणार 89 बॉर्डर आउटपोस्ट

datta jadhav

चायनीज खाद्यपदार्थांवरही बंदी घाला : रामदास आठवले

Rohan_P

गरिबांना सप्टेंबरपर्यंत मोफत धान्य द्या : सोनिया गांधींचे पंतप्रधनांना पत्र 

prashant_c
error: Content is protected !!