तरुण भारत

घरगुती गॅस महागला

प्रतिसिलिंडर 25 रुपयांची वाढ : गृहिणींचे बजेट कोलमडणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

पेट्रोल आणि डिझेल दरात होत असलेल्या वाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली असतानाच आता सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. सिलिंडर 25 रुपयांनी महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले असून सर्वसामान्यांतूनही नाराजी व्यक्त होत आहे. कोरोनाच्या संसर्गकाळातच महागाईची झळा तीव्र झाल्याने संताप व्यक्त होत आहे. काँग्रेसने इंधन-गॅस दरवाढीविरोधात आंदोलन केले असून याप्रश्नी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे.

दिल्लीत गुरुवारपासून सिलिंडर दरात 25.50 रुपयांची वाढ झाल्याने 14.2 किलोचा घरगुती सिलिंडर 809 रुपयांऐवजी 834.50 रुपयांना मिळत आहे. मुंबईतही 14.2 किलो एलपीजी सिलिंडरचा दर आता 834.50 रुपये आहे. कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरचा दर 835.50 रुपयांवरून 861 रुपये प्रतिसिलिंडर झाला आहे. तर चेन्नईमध्ये 850.50 रुपये मोजावे लागत आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे घरगुती गॅसची किंमत इतर शहरांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजेच 872.50 रुपये इतकी झाली आहे. तर गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये 841.50 रुपये इतका दर आहे.

गेल्या सहा महिन्यात गॅस सिलिंडरच्या किंमतीत 140.50 रुपयांची वाढ झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीत गॅस सिलिंडरची 694 रुपये असलेली किंमत आता 834.50 रुपये झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच जानेवारी  2021 मध्ये दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 694 रुपये होती, जी फेब्रुवारीमध्ये प्रतिसिलिंडरमध्ये 719 रुपये झाली. 15 फेब्रुवारीला ही किंमत 769 रुपये करण्यात आली. यानंतर 25 फेब्रुवारीला एलपीजी सिलिंडरची किंमत 794 रुपये करण्यात आली. मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत 819 रुपयांवर पोहोचली. एप्रिलच्या सुरूवातीला दहा रुपयांची कपात झाल्यानंतर दिल्लीतील घरगुती एलपीजीची किंमत 809 रुपये झाली. त्यानंतर आता जुलै महिन्यात हा दर 834.50 रुपयांवर पोहोचला आहे.

सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला गॅस सिलिंडरचे दर बदलतात. यापूर्वी 1 मे रोजी गॅस कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केला नव्हता. यापूर्वी एप्रिलमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 10 रुपयांची कपात केली गेली होती, तर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये किंमती वाढविण्यात आल्या होत्या.

दूधदरात वाढीचा ‘अमूल’चा निर्णय

कोरोना संसर्गाचा विळखा आणि महागाईच्या भडक्यात आता सर्वसामान्यांना दुधासाठीही जास्त पैसे मोजावे लागतील. ‘अमूल’ने दुधाची किंमत प्रतिलिटर 2 रुपयांपर्यंत वाढवली आहे. नवीन किंमती 1 जुलै 2021 पासून लागू झाल्या आहेत. ‘अमूल’पाठोपाठ आता अन्य कंपन्यांकडूनही दरवाढीची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दुधाच्या किंमतीत वाढ झाल्याने अन्य दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीही वाढू शकतात.

वाढत्या खर्चामुळे अमूल सहकारी संस्थेने दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या सर्व ब्रँडमध्ये प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ केली आहे. नव्या दरवाढीमुळे आता अमूल गोल्डसह अमूल शक्ती, अमूल ताजा, अमूल टी स्पेशल, अमूल स्लिम अँड ट्रिम दुधाच्या किंमतीही प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढविण्यात आल्या आहेत.

पेट्रोल-डिझेल दरवाढीला ब्रेक

गेल्या काही दिवसात सातत्याने वाढत जाणाऱया पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गुरुवारी स्थिर होत्या. गेले सलग दोन दिवस इंधन दरवाढ न झाल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, मे आणि जून या दोन महिन्यांमध्ये 32 हून अधिक वेळा वाढ झाली आहे. सध्या मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव 104.90 रुपये आहे. तर दिल्लीत पेट्रोल 98.81 रुपयांवर पोहोचला आहे.   मुंबईत आता डिझेलचा भाव 96.72 रुपये झाला असून दिल्लीत डिझेल 89.18 रुपये झाले आहे. पेट्रोलपाठोपाठ आता डिझेल दर बऱयाच शहरांमध्ये शंभरीच्या उंबरठय़ावर पोहोचला आहे.

Related Stories

संरक्षण क्षेत्राच्या पदरी निराशाच

Patil_p

रिव्हर्स रेपो आणि रेपो रेटमध्ये कुठलाही बदल नाही : शक्तिकांत दास

Rohan_P

”केंद्राप्रमाणे कंपन्या विकून राज्याला पैसे मिळत नाहीत”

Abhijeet Shinde

उत्तराखंडात कोरोनाबाधितांची संख्या 51,481 वर

Rohan_P

नवज्योत कौर यांचे ‘कॅप्टन’ना आव्हान

Patil_p

सणासुदीत रेल्वेकडून आणखी 200 ट्रेन

Patil_p
error: Content is protected !!