तरुण भारत

एटीएफ इंधन दरवाढीचा भार विमानप्रवाशांवर

कोरोना लॉकडाऊनचा सेवेवर परिणाम

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisements

कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षापासून विमान वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. कोरोना, लॉकडाऊनमधील नियमावलीचा परिणाम विविध देश, राज्यात राहिला आहे. परंतु हे असे असले तरी सध्या एअर टर्बाइन फ्यूल (एटीएफ)च्या वाढलेल्या किमतीमुळे विमान प्रवास प्रभावीत होत असल्याचे संकेत आहेत.

दिल्ली विमानतळावर देशातील प्रवाशांची माहिती घेतल्यास मे महिन्यात दररोज 18 हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. जूनमध्ये ही संख्या वाढत जात 62 हजारच्यावर पोहोचली आहे. दुसरीकडे इंधनदरातही वाढ झाली आहे. कोलकाता येथे एटीएफची किमत सर्वाधिक 72 हजारावर पोहोचली आहे. तर मुंबई आणि चेन्नई येथे हा दर सर्वात कमी 66 हजार 483 रुपयावर राहिला आहे. या बदलत्या दरामुळे हवाई प्रवास करणाऱया प्रवाशांना अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे.आगामी काळातही विमानाच्या इंधनाचे दर वाढत जाणार असल्याचे संकेत आहेत. जागतिक पातळीवरील वाढत जाणाऱया किमतीचा यावर काहीसा दबाव निर्माण होणार आहे.

 सहा महिन्यात तेजी एटीएफच्या किमती मागील सहा महिन्यात जवळपास 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. गुरुवारी दिल्लीमध्ये एटीएफची किमत 3.6 टक्क्यांनी वाढल्याचे पहावयास मिळाले आहे.

Related Stories

शेअर बाजारात सेन्सेक्स 400 अंकांनी तेजीत

Patil_p

ब्रिटानिया : 23 टक्के नफावाढ

Omkar B

प्राप्तीकर परताव्याचे काम वेगाने

Amit Kulkarni

लार्सन टुब्रोला मिळाले कंत्राट

Patil_p

‘कोरोना’ग्रस्त अर्थव्यवस्थेला ‘आरबीआय’चा डोस !

tarunbharat

अंतिम दिवशी सेन्सेक्स 984 अंकांनी कोसळला

Patil_p
error: Content is protected !!