तरुण भारत

मुलांना शिकविण्यासाठी आम्रवृक्षावरच स्टुडिओ

गावात नेटवर्क नसल्याने शिक्षकाची अनोखी उपाययोजना

लॉकडाउननंतरच्या काळात मुलांचे शिक्षण घरातूनच होत आहे. कुणाकडे स्मार्टफोन नाही तर काही गावात नेटवर्कच नसल्याची समस्या आहे. अशा स्थितीत मुले शिक्षणासाठी डोंगर चढून जात असल्याचे वृत्त वारंवार वाचनात येते पण कर्नाटकातील कोडगू जिल्हय़ाच्या मुल्लूर गावात एका शिक्षकाने झाडावरच स्वतःचे घर तयार केले आहे.

Advertisements

सी.एस. सतीश प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. ते इयत्ता पहिलीपासून पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवितात. त्यांच्या गावात इंटरनेटची सुविधा फारशी चांगली नाही. याचमुळे त्यांनी आम्रवृक्षावर स्वतःचा स्टुडिओ तयार केला आहे, कारण तेथे त्यांना पूर्ण नेटवर्क मिळते. मुलांचे शिक्षण अडथळय़ाशिवाय सुरू रहावे याकरता त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

सतीश हे याच स्टुडिओत दररोज व्हिडिओ तयार करतात आणि मुलांपर्यंत व्हॉट्सऍपच्या माध्यमातून पाठवतात. त्यांनी स्वतःचा हा स्टुडिओ बांबू आणि गवतासह टाकाऊ सामग्रीपासून तयार केला आहे. त्यांनी आम्रवृक्षावरच एक खोली तयार केली आहे. जमिनीपासून 20 फुटांच्या उंचीवर असलेल्या या खोलीमुळे आता नेटवर्क कनेक्टिव्हिटीची समस्या दूर झाली असून मुलांपर्यंत व्हिडिओज पाठविणे सोपे ठरले आहे.

हा स्टुडिओ सतीश यांनी स्वतःच तयार केला आहे. या गावात झाडावरील जागा वगम्ळता अन्यत्र कुठेच नेटवर्क चांगल्या स्थितीत नाही. सकाळी मुलांना होमवर्क पाठवतो, संध्याकाळपर्यंत मुले होमवर्क करून परत पाठवतात. या स्टुडिओत मुलांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी रंगबिरंगी बल्ब लावले आहेत. स्टुडिओत मुलांकरता पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.

सतीश हे मुलांना इंग्रजी, गणित आणि कन्नड विषय शिकवितात. गावातील मुले शहरातील मुलांच्या मागे राहू नयेत म्हणून त्यांनी हा स्टुडिओ तयार केला आहे. मुलांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याच्या आउट ऑफ बॉक्स विचाराने प्रोत्साहित होत त्यांनी हे अनोखे ट्री हाउस तयार केले आहे.

Related Stories

सीरियाला भारताकडून दोन हजार टन तांदूळ भेट

Patil_p

हरियाणात भाजप विरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको; पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये शेकडो शेतकरी रक्तबंबाळ

Abhijeet Shinde

“मौका सभी को मिलता है,” – नितेश राणेंचा इशारा

Abhijeet Shinde

नेपाळच्या राजकारणात ‘प्रचंड’ वादळ घोंगावणार

Patil_p

कोवॅक्सिनच्या लहान मुलांवरील चाचणीचा डेटा DCGI कडे

datta jadhav

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा ‘सेफ गेम’?

Patil_p
error: Content is protected !!