तरुण भारत

सेवाभावी डॉक्टर-सीएंचा यथोचित गौरव

डॉक्टर्स-सीए दिनाचे औचित्य साधून विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

कोरोनाकाळात स्वतःचा जीव धोक्मयात घालून काम करणारे डॉक्टर्स आणि शहरातील मान्यवर सीए यांचा सत्कार गुरुवारी रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथतर्फे करण्यात आला. डॉक्टर्स डे आणि सीए डे चे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सेवाभावी डॉक्टर्स आणि चार्टर्ड सीए या सत्काराने भारावून गेले.

महिला विद्यालय येथे गुरुवारी हा कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून इक्विटस बँकेचे शाखा व्यवस्थापक संतोष कोटबागी व अध्यक्ष म्हणून रोटेरियन बबन देशपांडे उपस्थित होते. क्लबचे अध्यक्ष अशोक नाईक, उपप्रांतपाल विक्रम जैन आदी व्यासपीठावर होते. रोपटय़ाला पाणी घालून उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी अध्यक्ष नाईक यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. कोरोना लसीकरण मोहीम रोटरीतर्फे आखण्यात आली असून अनेकांना लस देण्याचे महत्त्वाचे काम रोटरी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर कोरोनाकाळात उल्लेखनिय सेवा देणारे डॉ. अंबरीश नेर्लीकर, डॉ. मंजुनाथ गोरोशी, डॉ. संजीव नाईक, डॉ. रूपाली शिंदे, डॉ. भूषण सुतार यांचा शाल, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर सीए संजीव अध्यापक, शिवकुमार शहापूरकर,
ऍन्थोनी डिसोजा, गौरी नायक आणि एन. जी. गाडगीळ यांनाही शाल, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

डॉक्टरांच्यावतीने रूपाली शिंदे, डॉ. मंजुनाथ यांनी तर सीएवर्गाच्यावतीने शिवकुमार शहापूरकर आणि गौरी नायक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कोरोनाकाळात मास्क व सॅनिटायझरचा वापर अतिशय महत्त्वाचा आहे. स्वतः सुरक्षित राहून आपण तिसऱया लाटेला टाळू शकतो, अशी माहिती त्यांनी दिली.

यानंतर क्लबचे सदस्य डॉ. अल्पेश तोपराणी व डॉ. रूपाली तोपराणी, डॉ. मनोज व डॉ. नेत्रा सुतार, डॉ. सतीश पोतदार, डॉ. राजश्री कुलकर्णी, डॉ. सीमा आचमनी, डॉ. राजश्री मिसाळे, सीए रविंद्र कराडकर, शिवानंद हालभावी व राज बोळमळ यांचा सत्कार करण्यात आला. रोटे. आनंद बुकेबाग यांनी आभार मानले.

Related Stories

रेल्वे सुरू होताच प्रवाशांच्या संख्येत वाढ

Amit Kulkarni

बीएसएनएल पेन्शनर्सची थकबाकी द्या

Amit Kulkarni

कांदे विक्रेत्या व्यापाऱ्याची धक्कादायक आत्महत्या

Rohan_P

मल्लापूर पीजी येथे गांजा विकणाऱया तरुणाला अटक

Rohan_P

फेसबुक प्रेंड्स सर्कलतर्फे जीवनावश्यक साहित्याची मदत

Omkar B

माझा धर्म पशू बचाव संघटनेकडून गायीला जीवदान

Amit Kulkarni
error: Content is protected !!