तरुण भारत

यामी गौतमला ईडीकडून समन्स; चौकशीला हजर राहण्याचे आदेश


मुंबई \ ऑनलाईन टीम

सक्तवसुली संचलनालयाकडून म्हणजेच ईडीकडून (ED) बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमला चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. हे समन्स FEMA (Foreign Exchange Management Act) कायद्याच्या उल्लंघन केल्या संदर्भात मुंबईतल्या ईडी कार्यालयाने पाठवलं असल्याची माहिती आहे. यामी गौतमला 7 जुलै रोजी सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर होण्याबाबत ही नोटीस बजावली आहे.

माहितीनुसार यामी गौतमच्या बँक अकाऊंटमधून जवळपास दीड कोटींच्या परदेशी चलनाचा व्यवहार झाला आहे. यासंदर्भात तिनं अधिकाऱ्यांना सूचना दिली नसल्याचं समोर आलं आहे. यामीने केलेल्या व्यवहारात परदेशी चलनाच्या व्यवहारात अस्पष्टता आढळून आली आहे. यामीच्या बँक खात्यातील काही परदेशी व्यवहारात गोंधळ आढळून आला असल्याने यामीची चौकशी केली जाणार आहे. ईडीकडून यामीला ही दुसरी नोटीस आहे.

Advertisements

अलीकडे यामी गौतम ‘उरी’ चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य थरसोबत लग्नबंधनात अडकली. काही दिवसांपूर्वीच यामी गौतम आपल्या पतीसोबत मुंबईला परतली होती. तिच्या नव्या लूकचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच खूप व्हायरल झाला होता.

यामीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती ३ चित्रपट ‘भूत पुलिस’, ‘दसवी’, ‘अ थर्सडे’ यामध्ये दिसणार आहे. ‘भूत पुलिस’मध्ये यामी गौतमसोबत अर्जुन कपूर, सैफ अली खान आणि जॅकलीन फर्नांडिस प्रमुख भूमिकेत आहेत. ‘दसवी’मध्ये यामीसोबत अभिषेक बच्चन आणि निरमत कौर दिसणार आहेत. या चित्रपटात यामी आयपीएस ऑफिसराच्या व्यक्तिरेखेत आहे. तर ‘अ थर्सडे’ चित्रपटात यामी एका शिक्षिकेची भूमिकेत असणार आहे. ‘अ थर्सडे’ हा एक थ्रिलर चित्रपट आहे.

Related Stories

“एकाच आयुष्यात सोंग करायची तरी किती?”; भाजपच्या केशव उपाध्येंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Abhijeet Shinde

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा मनसेत

prashant_c

ऑगस्टपर्यंत संसर्गाचे प्रमाण शून्यावर : डॉ. रोहिदास बोरसे

prashant_c

Parliament Session Updates : कामकाज सुरू होताच विरोधकांचा जोरदार गदारोळ

Abhijeet Shinde

बंगालमध्ये लसीकरणावरून राजकारण

Patil_p

राज्यपाल कोश्यारींना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस

Rohan_P
error: Content is protected !!