तरुण भारत

जलजीवनच्या कामावरुन सदस्यांनी पाणी पुरवठा विभागाबाबत केली नाराजी व्यक्त

प्रतिनिधी/ सातारा

खटाव, माण हे दुष्काळी तालुके आहेत. या तालुक्यातील 19 गावे दुष्काळाच्या झळा सहन करत आहेत. त्यांचा समावेश जलजीवन या योजनेत करण्यात आलेला आहे. केवळ टँकरने पाणी पुरवठा करुन प्रश्न सुटणार नाही, अशा शब्दात उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सुरेंद्र गुदगे आणि वनिता कचरे यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्य पद्धतीवर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये जिल्हा परिषदेत गाजत असलेल्या इन्सेनीटर मशिन खरेदी घोटाळय़ाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवालाचे वाचन करण्यात आले. तसेच शेतकऱयांना डुक्कर मारायला परवानगी कशी असा प्रश्न उपस्थित करुन कृषी सभपती मंगेश धुमाळ यांचे अनोखे शेतकऱयांप्रती प्रेम दिसून आले. 

Advertisements

सातारा जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन व स्वच्छता विभागाची बैठक जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, जिल्हा परिषद सदस्या सौ.अर्चना देशमुख, वनिता गोरे, वनिता कचरे, महाडिक, निवास थोरात आदी उपस्थित होते. या बैठकीत जलजीवन मिशन योजनेचा आढावा घेत असताना खटाव तालुक्यातील सदस्यांनी ग्रामीण पाणी पुरवठयाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. उपाध्यक्ष प्रदीप विधाते व सुरेंद्र गुदगे यांनी जलजीवन योजनेतंर्गत त्या 19 गावातील पाण्याचा गंभीर प्रश्न कायमचा सोडवण्याऐवजी टँकरने पाणी देण्यात हा विभाग धन्यता मानतो आहे. तेथे विधन विहिरी घेतल्या गेल्या पाहिजेत. त्याकरता निधीची कमरतता भासत असेल तर त्याकरता प्रस्ताव मागणी केली पाहिजे मात्र, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही, अशा शब्दात नाराजी व्यक्त केली.

गेल्या चार महिन्यापूर्वी गाजत असलेल्या इन्सीनेटर मशिन खरेदी घोटाळय़ारता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांच्या सुचनेनुसार नेमण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवालाबाबत या बैठकीत समितीतील वनिता गोरे यांनी माहिती दिली.  त्यांनी माहिती देताना कोरेगाव, वाई आणि महाबळेश्वर या तालुक्यातील जेथे जेथे मशिन बसवण्यात आल्या आहेत. त्याची पाहणी केली. बसवलेल्या मशिनमध्ये 70 टक्के मशिन सुरु आहेत. 30 टक्के मशिनंना लाईट नसल्याने त्या बंद आहेत. त्या मशिनच्या जवळ व्हेंटर एटीएम मशिन बसवण्यात यावे, जेणेकरुन युवती, महिलांना लगेच सॅनिटरी पॅड मिळेल, असे त्यांनी सांगितले. अर्चना देशमुख यांनी लघु पाटबंधारे विभागाकडून देगावच्या तलावाच्या कामाचे का झाले नाही. वर्क ऑर्डर न दिल्याने, ती वर्क ऑर्डर दिली असती तर पावसाळयापूर्वी तलावांची कामे झाली असती पाणी टंचाईचा प्रश्न सुटला असता, असा मुद्दा मांडला. तर कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी वन्य प्राणी रानडुक्कर आहे. तो मारायला कशी परवानगी असा प्रश्न उपस्थित करुन शेतकऱयांप्रती आपण किती प्रेम जपतो हे दाखवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत त्यांच्या प्रश्नांवर वनविभागाने वन्य प्राण्याचा जो कॉरीडोअर आहे. तो शाबूत ठेवूनच काम करावे, त्यांच्या हद्दीत मानवाने अतिक्रमण केले केले ते मानवी वस्तीत येणार असे त्यांनी सांगितले.

Related Stories

तर मंदिरे उघडायला काय प्रॉब्लेम : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस

Abhijeet Shinde

पाटणच्या ठगाचा पुण्यातल्या तरुणीला गंडा

Patil_p

नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसबद्दल केले ”हे” वक्तव्य

Abhijeet Shinde

OBC समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण होणे हे भाजपाचे पाप : सचिन सावंत

Abhijeet Shinde

कोरोनानंतर आता मुंबईवर म्युकरमायकोसिसचे संकट

Rohan_P

अकरानंतर कराडात शुकशुकाट

Patil_p
error: Content is protected !!