तरुण भारत

‘जेडीयू’तील ‘या’ बड्या नेत्याला फोडून तेजस्वी यादवांचा नितीशकुमारांना दे धक्का

पाटणा /प्रतिनिधी

बिहारच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मोठा धक्का दिला आहे. जेडीयूतील नेत्याला फोडून आपल्या पक्षात प्रवेश दिल्याने नितीश कुमारांना चांगलाच धक्का दिला आहे. दरम्यान, लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पावसान यांच्या पक्षातील अनेक नेत्यांना फोडत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठा धक्का दिला होता. पण आता नितीशकुमारांनाच झटका बसला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी नितीशकुमारांच्या संयुक्त जनता दलातील माजी मंत्री महेश्वरसिंह यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे.

जेडीयू व आरजेडी एकत्रित सत्तेत असताना तेजस्वी यादव यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर नितीशकुमार यांनी युती तोडली होती. तेव्हापासून यादव व कुमार यांच्यात संघर्ष सुरू आहे. त्यामुळं दोन्ही पक्ष एकमेकांना शह देण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता जेडीयूचे नेते व माजी मंत्री महेश्वरसिंह हे आरजेडीमध्ये दाखल झाले आहेत. महेश्वरसिंह यांनी आज तेजस्वी यादव यांच्या उपस्थितीत आरजेडीमध्ये प्रवेश केला.

Advertisements

Related Stories

अवंतीपोरा परिसरातून अल-बदर संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक

datta jadhav

कोल्हापूरसाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या रवाना : राज्यमंत्री यड्रावकर

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात 3,537 नवीन कोरोनाबाधित; 70 मृत्यू

Rohan_P

ऑस्ट्रेलियातून दूध आयातीचा प्रस्ताव नाही

Patil_p

ठाकरे सरकारचे ‘या’ मागणीसाठी रेल्वेला विनंती पत्र

Rohan_P

…तर होणाऱ्या परिणामांना तुम्हीच जबाबदार : खा. उदयनराजे

datta jadhav
error: Content is protected !!