तरुण भारत

पुणेकरांना मोठा दिलासा; प्रशासनाने घेतला ‘हा’ धाडसी निर्णय

पुणे/प्रतिनिधी

राज्यातील काही दिवसांपूर्वी कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या पुण्यातील कोरोना परिस्थिती सुधारली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे २२ मार्चपासून जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले होते. आता पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटल्यामुळे सीओईपीच्या मैदानावरील जम्बो कोविड सेंटर अखेर बंद करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्याच्यादृष्टीने ही दिलासादायक बाब आहे.

पुणे जम्बो सेंटरमधील रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर १ जून रोजी रुग्णालयातील ३०० ऑक्सिजन बेड कमी करण्यात आल्या होते. पहिली लाट ओसरल्यानंतर जम्बो रुग्णालय १५ जानेवारी रोजी बंद करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या लाटेमुळे २२ मार्चपासून जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले होते. दुसऱ्या लाटेत २२ मार्च ते १ जुलै दरम्यान एकूण ३००९ रुग्ण जम्बोमध्ये दाखल झाले होते. त्यापैकी १,९०९ रुग्ण कोरोनावर मात करत घरी परतले होते. तर ६५४ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने जम्बो कोविड सेंटर अखेर बंद करण्यात आले. जर पुन्हा गरज पडल्यास हे जम्बो कोविड सेंटर पुन्हा कार्यान्वित केले जाईल, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

Advertisements

Related Stories

दिल्लीत आज आढळले 1118 नवे कोरोना रुग्ण; एकूण आकडा 1,36,176 वर

Rohan_P

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात ३१.१९ टीएमसी पाणीसाठा

Abhijeet Shinde

सांगली शहरात अतिक्रमण मोहीम तीव्र

Abhijeet Shinde

पूरग्रस्त कोणीही वंचित राहणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

Abhijeet Shinde

परराज्यातील प्रवाशांसाठी पुण्यातून शंभरावी श्रमिक ट्रेन रवाना : नवल किशोर राम 

Rohan_P

गुलालातील कार्यकर्त्यांची वरात पोलीस ठाण्याच्या दारात

Patil_p
error: Content is protected !!