तरुण भारत

रिचर्डसनला ऑलिम्पिक हुकणार

वृत्तसंस्था/ युगेनी

अमेरिकेची महिला धावपटू शाकेरी रिचर्डसनला टोकियो ऑलिम्पिकमधील 100 मी. धावण्याच्या शर्यतीला मुकावे लागणार आहे. रिचर्डसनची चाचणी करण्यात आली त्यावेळी तिच्या चाचणी नमुन्यामध्ये मॅरिजुआना हे अंमली द्रव आढळल्याचे सांगण्यात आले. रिचर्डसनची मॅरिजुआना चाचणी घेण्यात आली आणि ती दोषी असल्याचे आढळून आले. रिचर्डसनवर आता 30 दिवसांच्या कालावधीसाठी निर्बंध घालण्यात आले आहे.

Advertisements

तिच्यावरील निर्बंध 27 जुलैपर्यंत असेल. त्यामुळे ती टोकियो स्पर्धेत महिलांच्या 100 मी. धावण्यांच्या शर्यतीत सहभागी होऊ शकणार नाही. 19 जून रोजी घेण्यात आलेल्या ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत रिचर्डसनने 100 मी. धावण्यांच्या शर्यतीत 10.86 सेकंदाचा अवधी घेत प्रथम स्थान मिळविले होते. आता अमेरिकेच्या ऑलिम्पिक पथकामध्ये रिचर्डसनच्या जागी जेना प्रेनडिनीचा समावेश करण्यात येणार असल्याचे समजते.

Related Stories

पृथ्वी शॉचे दमदार पुनरागमन,

Patil_p

वेस्टहॅम, पॅलेस यांचा ऑस्ट्रेलिया दौरा लांबणीवर

Patil_p

बुद्धिबळ ऑलिम्पियाड : भारत उपांत्यपूर्व फेरीत दाखल

Patil_p

जमशेदपूरला नमवून चेन्नईन एफसीची विजयी सलामी

Patil_p

अपूर्वी, इलावेनिलला एअर रायफलमध्ये अपयश

Patil_p

नापोलीकडे इटालियन चषक

Patil_p
error: Content is protected !!