तरुण भारत

घटस्फोट घोषणेनंतर २४ तासाताच आमिर खान आणि किरण राव आले एकत्र …कसं ते वाचा सविस्तर

आमिर खान आणि किरण राव यांनी आपल्या नात्याला दिला नवा आयाम


ऑनलाईन टीम / मुंबई

Advertisements

बॉलीवूड स्टार आमिर खान आणि किरण राव यांनी 3 जुलै रोजी आपण या पुढे वेगळे होणार असल्याची घोषणा केली. 15 वर्षांच्या संसारानंतर यापूढे आपण वेगळे होणार असल्याचे सांगत आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. पण पुढच्याच 24 तासात त्यांनी पानी फाऊंडेशनतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येत फेसबुक लाईव्ह करुन आश्चर्याचा धक्का दिला आहे.
शनिवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात आमिर खान आणि किरण राव यांनी आपण यापूढे वैवाहिक जीवनात एकत्र राहणार नसलो तरी चित्रपट, पानी फाऊंडेशन आणि इतर प्रोजक्टमध्ये एकत्रित काम करत असल्याचं स्पष्ट केले.

पानी फाऊंडेशनतर्फे आयोजित केलेल्या ‘सोयाबीनची डिजिटल शेती शाळा’या उपक्रमात आमिर खान आणि किरण राव हे एकत्र आले होते. यावेळी त्यांनी थेट मराठीतून संवाद साधला.

या कार्यक्रमात सोयाबीनच्या स्पर्धेसंदर्भात आमिर खान, किरण राव शेतकरी, शेती तज्ज्ञ सहभागी झाली होते. तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सोयाबिनच्या बिज संदर्भात मशागत, फवारणी, उत्पादन वाढ या शंकाचे निरसण केले. या लाईव्हमध्ये आमिर खान, किरण राव यांच्यासोबतच दिग्दर्शक सत्यजीत भटकळ, डीएल मोहिते, डॉ. आरएस जाधव, विलास शिंदे यांनी ही सहभाग घेतला होता.

आमिर खान आणि किरण राव यांनी आपल्या नात्याला दिला नवा आयाम येथे क्लिक करत आपण पाहू शकता ही जोडी एकत्र

Related Stories

विरार रुग्णालयातील दुर्घटना ही काही राष्ट्रीय बातमी नाही : राजेश टोपे

triratna

तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार सोनाक्षी सिन्हा

Amit Kulkarni

राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा; पहिलं बक्षीस ५० लाख

triratna

ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात धोत्रेवाडीचा युवक ठार

triratna

अभिनेता दिलीप ताहिल यांच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात अटक

Rohan_P

घर बांधकामाला आता ग्रामपंचायतीची परवानगी हवी

triratna
error: Content is protected !!