तरुण भारत

सैन्यप्रमुख आजपासून युरोपीय देशांच्या दौऱ्यांवर

ब्रिटन अन् इटलीचा दौरा- संरक्षण सहकार्य वाढविण्याचा उद्देश

वृत्तसंस्था/ लंडन

Advertisements

भारतीय सैन्यप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हे 5 जुलैपासून ब्रिटन आणि इटलीच्या दौऱ्यावर असणार आहेत. स्वतःच्या 5 दिवसीय दौऱ्या दरम्यान सैन्यप्रमुख संबंधित देशांच्या वरिष्ठ सैन्याधिकाऱ्यांना भेटणार आहेत. या दौऱ्यादरम्यान  संरक्षण सहकार्य वाढविण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचे भारतीय सैन्याकडून सांगण्यात आले आहे. 8 जुलैपर्यंत नरवणे यांचा हा दौरा असणार आहे.

सैन्यप्रमुख स्वतःच्या दौऱ्यादरम्यान कॅसिनेंसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात भारतीय सैन्य स्मारकाचे उद्घाटन करणार आहेत. तसेच रोमच्या सेचिंगोलामध्ये इटालियन सैन्याच्या काउंटर आयईडी सेंटर ऑफ एक्सिलेंसला भेट देणार आहेत. सैन्यप्रमुख 5 आणि 6 जुलै रोजी ब्रिटनच्या दौऱयावर असतील. या दौऱ्या दरम्यान सीओएएस संरक्षण सचिव, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, चीफ ऑफ जनरल स्टाफ आणि अन्य महनीय व्यक्तींसोबत ते चर्चा करणार आहेत. तसेच ब्रिटनमधील विविध सैन्य प्रतिष्ठानांना भेट देत परस्पर हिताच्या मुद्द्यांवर विचारांचे आदान-प्रदान करणार आहेत.  स्वतःच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात (7 आणि 8 जुलै) सैन्यप्रमुख नरवणे हे इटालियन सैन्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि चीफ ऑफ स्टाफसोबत महत्त्वाची चर्चा करणार आहेत.

Related Stories

मधूमेह, रक्तदाब, 81 वर्षे वय तरीही कोरोनावर मात

Patil_p

#TokyoParalympics : गूगलचे खास डूडल पाहिले का ?

Abhijeet Shinde

दिल्लीत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Patil_p

नेहरू विद्यापीठ हल्ला आयशी घोषकडूनच!

Patil_p

पेट्रोल, डिझेल दरात पुन्हा वाढ

Amit Kulkarni

‘या’ राज्यातील तब्बल 192 विद्यार्थी आणि 72 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

Rohan_P
error: Content is protected !!