तरुण भारत

वाचनालय हे उच्च शिक्षण घेण्याचे मुख्य केंद्र

प्रतिनिधी /सांखळी

सांखळी परिसरात पुस्तक वाचणाऱया सर्वांना एक चांगली सोय सरकार कडून उपलब्ध करून देताना खूप आनंद होत आहे. त्याचा योग्य उपयोग सांखळीच्या नागरीकांनी करून घ्यावा, कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांचे चांगले काम सुरू आहे त्यास सरकारकडून पूर्ण सहकार्य दिले जाते, तसेच  वाचनालय हे उच्च शिक्षणाचे केंद्र असल्याने विद्यार्थ्यांनी त्याचा जास्त उपयोग करून घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सांखळी नगर वाचनालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत केले.

Advertisements

 गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालाय संस्कृती भवन पाटो पणजी आणि सांखळी नगर वाचनालय रवींद्र भवन सांखळी गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन वाचनालयाचे उदघाटन  कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते

सांखळी रवींद्र भवन येथे झालेल्या या कार्यक्रमास कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे,  यांची खास उपस्थिती होती या वेळी मूख्य अधिकारी  दीपक वायगणकर  के सुलक्षा ,संचालक अध्यक्ष,अशोक परब,उपाध्यक्ष सगुण वेळीप नगरसेवक आनंद काणेकर, दयानंद बॉर्येकर, यशवंत माडकर, रश्मी देसाई  विठोबा घाडी यांची उपस्थिती होती.   पुस्तक हे आपला गुरू तसाच मित्रही असून वाचन संस्कृतीची जपणूक होण्यास सुसज्ज अशी वाचनालये ऊभी राहणे आवश्यक आहे मंत्री गोविंद गावडे यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले, मुख्य अधिकारी दीपक वायगणकर यांनी ही वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा तसेच पुस्तकला आपला मार्गदर्शन गुरू आणि मित्र बनवावा,  जेणे करून भविष्यात त्याचा आम्हाला भरपूर फायदा होईल.  अशोक परब यांनी स्वागत केले तर सगुण वेळीप यांनी आभार मानले.

Related Stories

शांत रस्ते, सामसूम बाजार..दुपारनंतर सर्वत्र शुकशुकाट..!

Amit Kulkarni

पूर्ण सरकारच ‘सेटिंग’ करणाऱयांचे : सरदेसाई

Patil_p

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक

Amit Kulkarni

मडकईकर-फुर्तादो यांची आक्रमक भूमिका

Amit Kulkarni

भाजपचे सरकार हे असंवेदनशील सरकार

Patil_p

माजाळी येथील चेकनाक्यावर 10 लाखांची दारू पकडली

Amit Kulkarni
error: Content is protected !!