तरुण भारत

ED कारवाईपासून संरक्षण मिळावे; अनिल देशमुखांची सर्वोच्च न्यायालयात याचिका


मुंबई \ ऑनलाईन टीम

शंभर कोटींच्या वसुली प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडीने तिसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. अनिल देशमुखांना ईडीने आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यापूर्वीच अनिल देशमुखांनी ईडीच्या समन्सविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर येत्या काही दिवसात सुनावणी होणार आहे.

माझ्याविरुद्ध सुरु असलेली कारवाई कायद्याला धरुन नाही, पूर्वग्रहदूषितपणे सुरु असल्याचे मला जाणवत आहे. त्यामुळे माझ्या हिताचे रक्षण करण्यासाठी मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे असं अनिल देशमुखांनी म्हटलंय. मला जे घटनात्मक अधिकार आहेत त्याचा वापर मला करता येईल अशी अपेक्षा आहे. मी आतापर्यंत अनेक वेळा ECIR ची प्रत मागितली, कागदपत्रे मागितली पण ती मला दिली नाहीत असंही अनिल देशमुखांनी म्हटलं आहे.

या आधी ईडीने अनिल देशमुखांना दोनदा समन्स बजावलं होतं. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि वाढतं वय ही कारणं पुढं करुन अनिल देशमुखांनी ईडीला सध्यातरी चौकशी करु नये किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चौकशी करावी अशी विनंती केली होती.

Related Stories

पै . स्व . खाशाबा जाधव यांना पद्मभूषण पुरस्कार मिळवून देऊ – खा .संभाजी राजे छत्रपती

Abhijeet Shinde

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या अमिषाने 27 लाखांची फसवणूक

Sumit Tambekar

सातारा जिल्ह्यात ५१ कोरोनाबाधित रुग्णांची भर

Abhijeet Shinde

अद्ययावत सुविधांद्वारे कोविड केअर, हेल्थ सेंटर सज्ज ठेवा : जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

किम जोंग उन यांची प्रकृती खालावली, शस्त्रक्रियेनंतर धोका वाढला

prashant_c

कोल्हापूर : ‘कोरोना’चे 6 बळी, 354 पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!