तरुण भारत

2022 मध्ये ओएलइडी फीचर्सचे स्मार्टफोन लोकप्रिय

सध्याला बाजारात 39 टक्के मागणी – ऍपल, सॅमसंगच्या फोन्सचा मागणी

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

एका नव्या अहवालामध्ये 2022 पर्यंत दाखल होणारे बहुतेक स्मार्टफोन हे ओएलइडी फिचर्सचे असतील, असे म्हटले आहे. यासंदर्भातली माहिती ट्रेंड फोर्स यांनी नुकतीच दिली आहे. अलीकडच्या काळात स्मार्टफोन्सच्या विक्रीचा आढावा घेतला असता ओएलइडी फीचर्सच्या डिस्प्ले पॅनेलसह बहुतेक करून स्मार्टफोनची बाजारात मागणी राहिली असल्याचे दिसून आले आहे.

ऑरगॅनिक लाईट एमिटिंग डायोड डिस्प्ले (ओएलइडी) टेक्नॉलॉजीयुक्त मोबाईल स्मार्टफोन्स अधिक लोकप्रिय झाले आहेत. सदरच्या फिचर्सचा समावेश असलेल्या स्मार्टफोन्सची 2021 मध्ये आतापर्यंत 39 टक्के इतकी विक्री झाली आहे, असे कंपनीने सांगितले आहे तर 2022 पर्यंत ओएलइडीयुक्त स्मार्टफोन्सची 45 टक्क्यापर्यंत वाढीव विक्री होण्याचा अंदाज बांधला जात आहे. ऍपल व सॅमसंग या कंपन्यांनीही आता अमोलेड आणि ओएलइडीआधारीत स्मार्टफोन्स निर्मितीवर भर दिला आहे. या प्रकारच्या स्‍मार्टफोन्सना मागणी वाढली असल्याचे या दोन्ही कंपन्यांनी म्हटले आहे. बाजारातील मागणीचा कल लक्षात घेऊन या क्षेत्रातील फोन्समध्ये जास्तीत जास्त वाटा उचलण्यासाठी दोन्ही कंपन्यांचा आटापिटा असणार आहे. या प्रकारच्या स्मार्टफोन्सची चीपसेट ही इतर फोन्सच्या तुलनेत मोठी असते.

Related Stories

विवो व्ही 20 एसई स्मार्टफोन बाजारात

Patil_p

रेडमी नोट टेन येणार पुढच्या महिन्यात

Patil_p

3 महिन्यात 5 कोटी स्मार्टफोन्सची जम्बो विक्री

Patil_p

शाओमीचा एक्स सिरीजचा फोन 23 एप्रिलला

Amit Kulkarni

एमआय 11 अल्ट्रा 7 जुलैपासून विक्रीला

Patil_p

विवो एक्स 60 सिरीजच्या फोन्सची चलती

Patil_p
error: Content is protected !!