तरुण भारत

केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या महत्वाची बैठक

महागाई भत्त्यावर निर्णय शक्य – मंत्रिमंडळ विस्ताराचीही चर्चा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

उद्या बुधवारी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीत महागाई भत्त्यासंबंधी निर्णय, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर विचारमंथन, तसेच कोरोना नियंत्रण आणि लसीकरणाची स्थिती, यांवर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

26 जूनला जेसीएमची बैठक झाली होती. या बैठकीत सातव्या वेतन आयोगाच्या सूचनांनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱयांना महागाई भत्त्याची थकबाकी देण्यासंबंधीच्या मुद्दय़ावर निर्णय घेण्यात आला होता. कोरोना उद्रेकामुळे या कर्मचाऱयांना महागाई भत्त्याचे तीन हप्ते देण्यात आलेले नाहीत. थकबाकी आणि हे तीन हप्ते येत्या सप्टेंबरपर्यंत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होऊ शकतो.

कर्मचाऱयांना तिन्ही हप्ते आणि थकबाकी देण्याचा निर्णय झाल्यास सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडणार आहे. केंद्रीय कर्मचाऱयांची एकंदर संख्या 52 लाखांहून अधिक असून पेन्शनरांची संख्या 60 लाखांहून अधिक आहे. त्यांना जानेवारी 2020, जुलै 2020 आणि जानेवारी 2021 असे महागाई भत्त्याचे तीन हप्ते दिले गेलेले नाहीत, अशी महिती सूत्रांकडून देण्यात आली.  

लसीकरणाचा आढावा

या बैठकीत देशव्यापी लसीकरणाचा आढावा घेण्यात येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत देशातील 35 कोटी नागरिकांना कोरोना लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे. तर सहा कोटी लोकांना दोन्ही डोस देण्यात आलेले आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत 80 कोटी नागरिकांना लस देण्याचे ध्येय आहे.

Related Stories

राज्यातील बेरोजगारांना 450 प्रवासी टॅक्सींचे वितरण

Patil_p

नाग्याचे समुपदेशन

Patil_p

कोरोनाचा उद्रेक : दिल्लीसह ‘या’ राज्यांमधील शाळा – कॉलेजेस आता पुन्हा बंद

Rohan_P

काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गोळीबारात ५ जणांचा मृत्यू;उड्डाणे रद्द झाल्याने भारतीयही अडकले

Abhijeet Shinde

शेतकऱ्यांच्या मोर्चाला 12 पक्षांचा पाठिंबा

Patil_p

आता अखिलेश यादवांनीही ‘खेला होबे’ म्हणत भाजपाविरोधात ठोकला शड्डू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!