तरुण भारत

साताऱयात चोरटय़ाकडून 50 मोबाईल हस्तगत

प्रतिनिधी/ सातारा

साताऱयात विविध ठिकाणाहून मोबाईल चोरी करणाऱया अट्टल मोबाईल चोरटय़ास जेरबंद करण्याची कामगिरी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने बजावली असून या चोरटय़ाकडून चोरीची तब्बल 50 मोबाईल हस्तगत केले आहेत. या मोबाईल्सची किंमत 5 लाख 700 रुपये असून हे सर्व मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. विकास अशोक खंडागळे (वय 29 रा. प्रतापसिंहनगर, सातारा) असे अटक केलेल्या चोरटय़ाचे नाव आहे.

Advertisements

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहर व परिसरात दुचाकी चोऱयांसह मोबाईल चोऱयांचेही प्रमाण वाढले आहे. मोबाईल चोरीच्या वाढत्या प्रकारामुळे वरिष्ठांनी हे उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला तपास करण्यास सांगितले. या अनुषंगाने तपास सुरु असताना दि. 9 जानेवारी रोजी साताऱयातील संभाजीनगरात सुरु असलेल्या बांधकाम साईटच्या पत्र्याच्या शेडमधून प्रतापसिंहनगरातील एकाने मोबाईल चोरल्याची माहिती मिळाली.

डीबीच्या तपास पथकाने यातील संशयित विकास खंडागळे याला 1 जुलै रोजी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने संभाजीनगरात केलेल्या चोरीची कबुली दिल्यावर 5 हजार रुपयांचा मोबाईल हस्तगत करण्यात आला. त्याला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर केलेल्या चौकशीत मात्र त्याने अनेक ठिकाणी मोबाईल चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. त्याने तब्बल 50 मोबाईल चोरल्याचे सांगितल्याने पोलीस देखील चक्रावून गेले होते.

पोलिसांनी त्याने चोरलेले 5 लाख 700 रुपये किंमतीचे तब्बल 50 मोबाईल हस्तगत करत अनेकविध मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कामगिरीबद्दल पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्यासह डीबी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, हवालदार गुलाब जाधव, पोलीस नाईक अविनाश पवार, ज्योतीराम पवार, शिवाजी भिसे, कॉन्स्टेबल गणेश घाडगे, अभय साबळे, संतोष कचरे, गणेश भोंग, विशाल धुमाळे यांचे अभिनंदन केले आहे.

Related Stories

नगराध्यक्षांनी पदाचा गैरवापर करून मानधन घेतले

Patil_p

लोकनियुक्त सरपंच सदाशिव बाटे यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव नामंजूर

Abhijeet Shinde

सांगली : वारंवार पूराचा फटका बसणाऱ्या घरांचे तातडीने सर्व्हेक्षण करा – उपमुख्यमंत्री

Abhijeet Shinde

पुणे जिल्ह्यात होळी, धुलिवंदन उत्सव साजरा करण्यास मनाई : जिल्हाधिकारी

Rohan_P

‘या’ कारणांमूळे कोल्हापूरचा कोरोना मृत्यूदर देशात सर्वाधिक

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिह्यात आणखी १७ रुग्णांची भर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!