तरुण भारत

कराडात बुधवारपासून दुकाने उघडणार

प्रतिनिधी/ कराड

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्हय़ात पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवेत नसणारी दुकाने बंद झाली आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गात नाराजी आहे. सोमवारी शहरातील विविध व्यापारी संघटनांनी एकत्र येत तहसील कार्यालय, नगरपालिकेत निवेदन दिले. त्यात बुधवारपासून दुकाने उघडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisements

सर्व व्यापाऱयांनी सोमवारी तहसील कार्यालय, नगरपालिका, पालकमंत्री, आमदार यांना निवेदन दिले. सद्याचे कडक निर्बंध मागे घेऊन दुकाने पूर्ववत सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी द्यावी, अशी प्रमुख मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. प्रशासनाने याबाबत विचार करावा अन्यथा दुकाने उघडण्यास परवानगी नाही मिळाली तरी बुधवारपासून आम्ही व्यापारी सर्व दुकाने उघडणार आहोत. प्रशासनाने कितीही दंड केला तरी तो भरणार नाही. आमच्या या निर्णयास विविध राजकीय पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला आहे, असे व्यापाऱयांच्या वतीने सांगण्यात आले.

Related Stories

कराड शहरातील सात जिम सील

Patil_p

बकरी ईद : केरळ सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Abhijeet Shinde

कापला, कापला दोर कापला….पतंग तोडला

Patil_p

औषध विक्रेत्यांना विमा सुविधेचा लाभ मिळणे गरजेचे-आमदार आबिटकर यांची मागणी

Abhijeet Shinde

ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांचं निधन

Abhijeet Shinde

सातारा : खासदार श्रीनिवास पाटील चक्क पंचायत समितीच्या मासिक सभेला ऑनलाईन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!