तरुण भारत

कुडचडेतील काँग्रेस कार्यकर्त्यांचा ‘आप’मध्ये प्रवेश

प्रतिनिधी /कुडचडे

काँग्रेस पक्षासाठी आपण जे काम केले त्याला कोणतीच मर्यादा नव्हती तरी कधी समाधान झाले नाही. जे समाधान आम आदमी पक्षात मिळाले आहे त्याचे वर्णन आपण शब्दांनी करू शकत नाही. तो एक वेगळाच आनंद आहे तसेच आज येथे जे शंभर हून लोक आम आदमी पक्षाला साथ देण्यासाठी उपस्थित झाले आहे ते पाहून अधिक आंनद झालेला आहे असे उद्गार आम आदमी पक्षाच्या प्रतिमा कुतिन्हो यांनी काढले.

Advertisements

कुडचडे मतदारसंघातील सुमारे 100 काँग्रेस कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. त्यावेळी प्रतिमा कुतिन्हो बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, आज प्रत्येक पक्षाचे जे राजकारण चालले आहे, त्या बद्दल बोलायल सुद्धा लाज वाटते. सद्या कार्यरत भाजप सरकार जनतेला सेवा देण्यावर भर न देता पक्ष मजबूत कारण्यास प्रथम प्राधान्य देताना दिसत आहे. त्यामूळे जनता चिंतेत दिसून येत आहे.

आम आदमी पक्षाने जनतेला चांगल्या सोयी देण्यासाठी जनतेवर विश्वास ठेऊन यंदा विधानसभा निवडणुकीत उतरून सरकार स्थापन करण्याचे ठरविले आहे. व या निर्णयाला सर्वांचे सहकार्य मोलाचे आहे. आज आम आदमी पक्षाने घरोघरी जाऊन लोकांच्या अडचणी जाणून घेण्याचे कार्य सुरु केले आहे. त्यात आपल्यावर ही जबाबदारी दिल्यामुळे जनतेच्या वास्तविक अडचणी आपल्याला समजू लागल्या आहेत. त्याप्रमाणे आपण सदर अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे.

गोव्यात आम आदमी पक्षाचे सरकार नाही. तरी कोविड काळात उत्कृष्ट कार्य कार्यकर्त्यांनी केलेले आहे. राज्यात आवश्यक लोकांना ओक्सिनज पूरवठा, कडधान्य वितरण व अन्य अडचणीत असलेल्या लोकांना पुर्ण पणे सहकार्य केलेले आहे. पण सत्ताधारी पक्षाचे मंत्री आजही घरात बसून आहेत हे कुडचडेच्या लोकांचे व गोव्यातील जनतेचे दुर्भाग्य आहे. आज कुडचडे मतदारसंघातील आमदार राज्याचे वीजमंत्री असूनही विजेचा वाईट अनुभव कुडचडेची जनता घेत आहे. हे लोकांच्या तक्रारी ऐकून जाणीव झाली आहे व याचा आपण निषेध करीत असल्याचे प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या

यावेळी त्यांच्या सोबत आम आदमी पक्षाचे नेते दुर्गेश पाठक आणि महेंद्र चौधरी, नगरसेविका क्लेमेंटींना फर्नांडिस, जॉन फर्नांडिस, गाब्रियल फर्नांडिस उपस्थित होते. या वेळी कुडचडे काँग्रेस महिला गट अध्यक्ष रोशन गावकर यांनी आम आदमी पक्षात आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन प्रवेश केला.

आम आदमी पक्षाची ओळख घरा घरात पोचविण्याची आज खरी गरज असून प्रत्येक कार्यकर्ते आज पक्षाचे कार्य एक चळवळ म्हणून पुढे न्हेण्यासाठी येत आहे. आपल्या भावी पिढीच्या सुरक्षे साठी आम आदमी हाच एकमेव पर्याय असल्याचे जॉन फर्नांडिस यांनी सांगितले. तुम्ही सर्वांनी दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार पाहिले आहे व त्यात सामान्य लोकांना किती प्राध्यान दिले आहे ते उघड झालेले आहे. त्यासाठी आता कोणालाही न घाबरता पक्षाच्या कार्याला सहकार्य देऊन गोव्यात आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन करण्यासाठी एकजूट होऊन काम करूया असे आवाहन आपच्या नगरसेविका क्लेमेंटींना फर्नांडिस यांनी केले.

Related Stories

‘तरुण भारत’च्या दिवाळी अंकात लयबद्धता

Omkar B

वास्कोत भाजपापासून दुरावलेल्यांचा पक्षात पुन्हा प्रवेश, सदानंद शेट तानावडे यांनी केले स्वागत

Amit Kulkarni

अंत्योदय तत्त्वावर सरकार कार्य करत राहील

Amit Kulkarni

विधानसभेचे पाच दिवसीय अधिवेशन आजपासून

Patil_p

‘कोविड-19’ रुग्णांवरील आयुर्वेदिक उपचारांची सविस्तर माहिती द्यावी

Omkar B

गढूळ पाण्याच्या समस्येने सार्वजनिक पाणीपुरवठा खाते खडबडून जागे

Patil_p
error: Content is protected !!