तरुण भारत

रेशनधान्य दुकानांची मंगळवारची सुट्टी रद्द

प्रतिनिधी /बेळगाव

रेशन दुकानांना प्रत्येक मंगळवारी सुट्टी देण्यात येत होती. पण ही सुट्टी रद्द करण्यात आली असून राष्ट्रीय सुट्टी दिवशी सुट्टी घेण्याचा आदेश जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ यांनी बजावला आहे. तसेच रेशनकार्डधारकांना कोणत्याही अडचणी निर्माण झाल्यास 1967 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Advertisements

जिह्यातील रेशनदुकानदारांना शासनाकडून दिलेल्या वस्तू व्यतिरिक्त अन्य वस्तुची विक्री रेशनसोबत करू नये असा सज्जड इशारा देण्यात आला आहे. तसेच  रेशनधारकांकडून इंटरनेट चार्जिस वसुल करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मास्क वापरणे व सामाजिक अंतर राखून रेशन वितरण करण्याची सुचना केली आहे.

जुलै महिन्याचे रेशनधान्य वितरित कोरोना दुसऱया लाटेमुळे गरीब कल्याण योजना आणि राष्ट्रीय आहार भद्रता कायद्यानुसार जूलै महिन्याचे रेशनधान्य वितरित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ यांनी कळविले आहे. कोरोना काळात अडचणीत सापडलेल्या नागरिकांना जूलै महिन्याचे रेशन देण्यात येणार आहे. अंत्योदय रेशनकार्डवर 35 किलो तांदुळ आणि प्रत्येक सदस्यामागे पाच किलो तादुळ देण्यात येणार आहेत. तसेच बीपीएल रेशनकार्डधारकांना दोन किलो गहू आणि प्रत्येक सदस्याला पाच किलो तांदुळ आणि एपीएल कार्डधारकांना प्रत्येक सदस्याला पाच किलो तांदुळ दोन पेक्षा जास्त सदस्य असल्यास 10 किलो तांदुळ प्रति 15 रूपये किलोने देण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

Related Stories

शासकीय कागदपत्रांसाठी गर्दी

Amit Kulkarni

शिक्षक बदलीसाठी जिल्हय़ात 2 हजार 927 अर्ज

Patil_p

साईराज वॉरियर्स, विश्रृत स्ट्रायकर्सची विजयी सलामी

Patil_p

खानापूर तहसीलदार कार्यालयाची ‘अपकीर्ती’ पोहोचली विधानसभेत!

Omkar B

राष्ट्रमाता जिजाऊंचे संस्कार ही काळाची गरज

Amit Kulkarni

आचारसंहिता लागू ,अवैद्य कामांना घाला आळा

Patil_p
error: Content is protected !!