तरुण भारत

नेहरुनगर येथील केपीटीसीएल कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद

प्रवेशद्वारासमोर वाहनांच्या रांगा : नागरिकांमधून संताप

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

नेहरुनगर येथील केपीटीसीएल कार्यालयाचे प्रवेशद्वार सोमवारी बंदच होते. यामुळे कार्यालयीन कामकाजासाठी आलेल्या नागरिकांना रस्त्यावर वाहने लावून जावे लागत होते. प्रवेशद्वार बंद का केले, याबाबत सुरक्षा रक्षकांनाही माहिती नसल्याने केपीटीसीएल प्रशासनाचा अंदाधुंदी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

केपीटीसीएल परिसरात हेस्कॉमचे शहर कार्यकारी अभियंत्यांचे कार्यालय, शहर उपविभाग 3, ग्रामीण उपविभाग 1 कार्यालय तसेच केपीटीसीएलचे मुख्य कार्यालयदेखील आहे. यामुळे बेळगाव शहर, तालुका, बागलकोट, विजापूर येथून नागरिक कार्यालयीन कामकाजासाठी या ठिकाणी येतात. या संपूर्ण परिसराला दोन प्रवेशद्वारे असून एक नेहरुनगर येथील मुख्य रस्त्यावरून तर दुसरे केपीटीसीएल रोडमार्गे आहे. बऱयाचवेळा केपीटीसीएल रोडवर असणारे प्रवेशद्वार बंद असल्याने नागरिक व कर्मचारीही मुख्य प्रवेशद्वारानेच प्रवेश करतात.

सोमवारी कार्यालयीन कामकाजाचा पहिलाच दिवस असल्याने कर्मचारी व नागरिकांची गर्दी झाली होती. परंतु मुख्य प्रवेशद्वार कुलूप लावून बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांचे पुरते हाल झाले. रस्त्यावर गाडय़ा लावून त्यांना परिसरातील कार्यालयापर्यंत जावे लागत होते. यामुळे प्रवेशद्वारासमोर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रवेशद्वार का बंद केले, याबद्दल अधिकारीही अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.

Related Stories

टाळ-मृदंगाच्या गजरात निघाली ग्रंथदिंडी

Patil_p

सफाई कर्मचाऱयांच्या समस्या निवारणाचा ठराव

Amit Kulkarni

बेळगाव थिएटर असोसिएशनच्या नाट्य महोत्सवाला उस्फूर्त प्रतिसाद

Rohan_P

लोकमान्य सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा

Omkar B

परिवहन कर्मचाऱयांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा

Patil_p

अट्टल सायकल चोराला अटक : 13 सायकली जप्त

Amit Kulkarni
error: Content is protected !!