तरुण भारत

गांधीनगर येथे एकाचा खून, एक ताब्यात तर एक फरारी

उचगाव / वार्ताहर

घर भाडे देण्याच्या कारणावरून दोघांनी संगनमताने मद्यधुंद अवस्थेत राजू पातलीया मुजालदा (वय ३० मूळ रा. सेमलखुट पो.हेलापडवा ता.झिरणया जि.खरगोन मध्यप्रदेश सध्या राहणार शांती प्रकाशनगर झोपडपट्टी गडमुडशिंगी ता.करवीर) याचा डोक्यात दगड घालून खून केला. गांधीनगर रेल्वे स्टेशन परिसरात मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही खूनाची घटना उघडकीस आली.

दिनेश शेखडिया गेहलोत (वय २८) व सुरज मांगीलाल गेहलोत (वय १८ दोघेही रा.नांदिया टोपलिया ता. झिरन्या जि. खरगोन मध्य प्रदेश, सध्या राहणार शांती प्रकाशनगर झोपडपट्टी गडमुडशिंगी ता.करवीर ) अशी संशयित आरोपींची नावे असून पैकी सुरज गेहलोत याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी मृत राजू ,दिनेश, व सुरज तिघेही मोलमजुरी करणारे परप्रांतीय गडमुडशिंगी येथील शांतीप्रकाश नगर मध्ये भाड्याने राहत होते. सोमवारी रात्री हे तिघेही जेवण्यासाठी एकत्र आले. त्यांच्यात घर भाडे देण्यावरून वादावादी झाली. वादावादी वाढत गेल्याने तिघांमध्ये भांडण सुरू झाले. रागाच्या भरात मद्यधुंद अवस्थेतील दिनेश व सूरजने राजू मुजालदा याच्या डोक्यात दगड घातला त्याच्यात तो जागीच मरण पावला. गांधीनगर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली असून या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सपोनि दीपक भांडवलकर करत आहेत.

Advertisements

Related Stories

कोल्हापुरात सोमवारी रस्ता केला अन् मंगळवारी खोदला !

Abhijeet Shinde

आरटीओ कार्यालयाची वीज तोडली; कामकाज ठप्प

Patil_p

एसटी संप : कारवाईच्या भीतीने कर्मचाऱ्याचा हृदय विकाराने मृत्यू

Abhijeet Shinde

ऐतिहासिक दसरा चौकात रंगला `शाही दसरा’

Abhijeet Shinde

प्रशासक पदावर योग्य व्यक्ती आणि लोकशाही जिंकली

Patil_p

302 मधील संशयिताने प्रशासनाला धरले वेठीस

datta jadhav
error: Content is protected !!