तरुण भारत

कोल्हापूर : मोफत सीएनसी, व्हीएमसी मशिन प्रशिक्षणास प्रारंभ

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोरोनाच्या संकट काळामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन रोजगार निर्मितीच्या उद्देशाने विद्या प्रबोधनी संस्था व श्री इंडस्ट्रीज वाय पी पोवार नगर यांच्या मार्फत मोफत सीएनसी आणि व्हीएमसी प्रशिक्षणाची सुरवात करण्यात आली. विद्याप्रबोधनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांचे हस्ते या वाय.पी.पोवार नगर येथे प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले.

`विद्या प्रबोधिनी’ रोजगार व मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांसाठी रोजगार उपलब्धतेसाठी विविध उपक्रम राबवले जात असतात. याचधर्तीवर मोफत सीएनसी आणि व्हीएमसी प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे.

Advertisements

उद्घाटनप्रसंगी बोलताना राहुल चिकोडे म्हणाले, सध्याच्या बेरोजगारीच्या काळात प्रत्येकाने नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या नवीन संकल्पना वापरून व्यवसाय, उद्योग निर्मितीसाठी प्रयत्नशील असले पाहिजे. लॉकडाऊन, कोरोनाच्या संकटामध्ये अनेक बेरोजगार लोकांनी अशाच पद्धतीने आपले छोटे व्यवसाय सुरु केले आहेत. सीएनसी आणि व्हीएमसीच्या प्रशिक्षणामधून नव्या व्यवसायासाठी मेहनत करून सक्षम उद्योजक बनण्यासाठी कष्ट घेण्याची गरज आहे.

श्री इंडस्ट्रीजचे आनंद पेंडसे यांनी औद्योगिक क्षेत्रांमध्ये कोणकोणत्या नवनवीन संधी आहेत तसेच या प्रशिक्षणा दरम्यान वर्कशॉपमध्ये कोणत्या पद्धतीची काळजी घ्यावी याबाबतची माहिती दिली. सीएनसी आणि व्हीएमसी ट्रेनिंगचे प्रशिक्षक संतोष परीट यांनी प्रशिक्षणाविषयी माहिती दिली. या प्रशिक्षण कार्यक्रमात शहर व ग्रामीण परिसरातील 25 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून वाय.पी.पोवार नगर येथे श्री इंडस्ट्रीजमध्ये या विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याप्रसंगी विजयसिंह पाटील, जयदीप मोरे, गजानन तुळजन्नवर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

Related Stories

कोल्हापूर : नृसिंहवाडीत दक्षिणद्वार सोहळा संपन्न

Abhijeet Shinde

वारणा साखर कामगार संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

Abhijeet Shinde

कोडोलीत तीन गाईंचा आगीत होरपळून मृत्यू

Abhijeet Shinde

कोल्हापूर : गडहिंग्लजमध्ये मराठा समाजाचे तासभर ‘रास्ता रोको’ आंदोलन

Abhijeet Shinde

कणेरी परिसरात सापडले दोन कोरोना रुग्ण

Abhijeet Shinde

किटवाड-ढोलगरवाडी रस्त्याचे काम दर्जाहीन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!