तरुण भारत

कोल्हापूर : शाहीर अरुण शिंदे यांचे निधन

प्रतिनिधी / कोल्हापूर

मिमिक्री आर्टिस्ट, निवेदक आणि शाहीर म्हणून लौकिक संपादन केलेले हरहुन्नरी कलाकार आणि साळोखेनगरमधील शिवशक्ती हायस्कूलमधील प्रयोगशाळा सहाय्यक अरुण गंगाराम शिंदे (वय 58, रा. दादू चौगले नगर, सुर्वे नगरजवळ) यांचे सोमवारी कोरोनाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Advertisements

गेली पंचवीस वर्षे शाहीरी कलेला वाहून घेतलेल्या शिंदे यांच्या निधनाने एक अष्टपैलू कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. शिंदे यांनी शाहीरविशारद डॉ. आझाद नायकवडी यांच्या शाहीरी पथकात अडीच दशके शाहिरी कलेची सेवा केली. शिंदे मिमिक्रीतून रसिकांना मनमुराद हसवित असत. नाकाव्दारे सनई वादन करण्यातही ते पारंगत होते. अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालक, निवेदक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पाडली होती.

Related Stories

आधुनिक महाराष्ट्राचे यशवंतराव चव्हाण `शिल्पकार’ – शाहूकार डॉ. रमेश जाधव

Abhijeet Shinde

प्रयाग चिखली पुनर्वसनसाठी 20 ऑक्टोबरला सर्व्हेक्षण करा

Abhijeet Shinde

यंदा अंबाबाई-जोतिबा चरणी 83 लाखांचे दागिने अर्पण

Omkar B

कोडोलीत मुंबईहून आलेल्या महिलेची माहिती घेण्यास गेलेल्या आशासेविकेस शिवीगाळ

Abhijeet Shinde

बेटी बचाव फाऊंडेशनमार्फत स्कूल बॅगचे वाटप

Abhijeet Shinde

‘ पक्ष मजबुती ’ मध्ये कोल्हापूर राष्ट्रवादी आघाडीवर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!