तरुण भारत

आता वातानुकूलित बसेसही मार्गांवर

प्रतिनिधी /बेळगाव

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनलॉक जारी करण्यात आला आहे. याबरोबरच विविध क्षेत्रांना शिथिलता मिळाली आहे. बाहेर फिरणाऱयांची संख्या वाढल्यामुळे प्रवाशांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे स्थानिक बसबरोबरच वातानुकूलित बसदेखील विविध मार्गांवर धावताना दिसत आहेत.

Advertisements

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने टप्प्याटप्प्याने अनलॉक जारी करण्यात आला आहे. शिवाय अनलॉक मार्गसूचीनुसार आणखी काही क्षेत्रांना सुट देण्यात आली आहे. दरम्यान, धार्मिकस्थळे व मॉलना हिरवा कंदील मिळाल्याने बाहेर ये-जा करणाऱयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे स्थानिक बसबरोबर लांब पल्ल्याच्या बसच्या फेऱयाही वाढल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत हळूहळू वाढ होताना दिसत आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून महाराष्ट्रात धावणाऱया बसेसची संख्या कमी झाली आहे. शिवाय गोवा राज्यात धावणारी बससेवा ठप्प आहे. त्यामुळे बेळगाव विभागाच्या महसुलात म्हणावी तशी वाढ झाली नाही. बेळगाव विभागाचा महसूल महाराष्ट्र व गोवा राज्यात धावणाऱया बसेसवर अवलंबून आहे. मात्र, मागील दोन महिन्यांपासून कोरोनामुळे आंतरराज्य बससेवा विस्कळीत झाल्याने महसुलावरही परिणाम झाला आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून वडगाव, अनगोळ, कणबर्गी, संतिबस्तवाड, होनगा, काकती, मुचंडी, उचगाव, रामतीर्थनगर, कंग्राळी (बी. के.), बस्तवाड, हिरेबागेवाडी, खानापूर यासह निपाणी, हल्याळ, संकेश्वर, बैलहोंगल, सौंदत्ती, गोकाक, चिकोडी, पाच्छापूर, हुबळी, धारवाड आदी ठिकाणी बस धावत आहेत.

Related Stories

हिंडलगा महालक्ष्मी यात्रेला अलोट गर्दी

Omkar B

शिवार रस्त्यावरील वृक्षसंवर्धन गरजेचे

Amit Kulkarni

प. पू. पंन्यास भद्रानन्दविजयजी महाराज यांचे महानिर्वाण

Patil_p

हिंडलगा मराठी शाळेच्या इमारतीची कॉलमभरणी

Amit Kulkarni

सीमाभागातील मराठी शाळांना आर्थिक साहाय्य द्या

Amit Kulkarni

आतापर्यंत 40 हजार संशयितांची स्वॅब तपासणी

Rohan_P
error: Content is protected !!