तरुण भारत

सांगली : आरगेत घर फोडून दीड लाखांचे दागिने लंपास

प्रतिनिधी / मिरज

मिरज तालुक्यातील आरग येथे मंगसुळी रस्त्यावरील घर फोडून अज्ञात चोरटयांनी सुमारे दिड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. याबाबत सुरज शिशुपाल कांबळे, (वय २९) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सुरज कांबळे यांचे आरग गावापासून काही अंतरावर असलेल्या मंगसुळी रस्त्यावर मातोश्री निवास नावाचे घर आहे. सोमवार ५ रोजी ते घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी त्यांच्या घराचे कुलूप कशाने तरी तोडून दरवाजा उघडला. त्यानंतर घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले सुमारे साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

Advertisements

Related Stories

तरुणीवर बलात्कारप्रकरणी निलंबीत पोलीस निरीक्षक विपीन हसबनिसना अटक

Abhijeet Shinde

सांगली जिल्हय़ात 34 जणांचा मृत्यू, नवे 763 रूग्ण

Abhijeet Shinde

विट्यात पोहताना बुडून युवकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

सांगली : सातत्याने पाठपुरावा केल्याने जतला म्हैसाळ योजनेचे पाणी

Abhijeet Shinde

सांगली जिह्यात दहा रूग्ण वाढले

Abhijeet Shinde

कृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता

Abhijeet Shinde
error: Content is protected !!