तरुण भारत

दोघा दुचाकी चोरट्यांना अटक, चोरीच्या दोन किंमती दुचाकी जप्त

प्रतिनिधी / इचलकरंजी

शहरातील शिवाजीनगर पोलिसांनी कोरोची (ता. हातकणंगले) येथील रेकॉर्डवरील एका गुन्हेगारासह दोघांना अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. गुन्हेगार रामा अशोक कोरवी (रा. पाण्याच्या टाकीजवळ, कोरोची) त्याचा साथिदार नागेश हणमंत शिंदे (रा. कोरोची, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली.

Advertisements

पोलीस निरीक्षक पिंगळे म्हणाले, पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजय फौंड्री जवळून महेश बसाप्पा कोष्टी (रा. इचलकरंजी) याची दुचाकी १ जुलैला चोरीस गेली होती. या बाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा शोध सुरु असताना गुन्हेगार रामा कोरवी आणि साथिदार नागेश शिंदे (रा. कोरोची, ता. हातकणंगले) या दोघांनी ती दुचाकी चोरल्याचे बातमीदाराकडून समजले. त्यावरून त्याचा शोध घेवून ताब्यात घेवून, चौकशी सुरु केली. याच दरम्यान त्या दोघांनी त्या दुचाकीसह शहापूर पोलीस ठाण्याच्या खोतवाडी, (ता. हातकणंगले) मराठी शाळेजवळून आणखीन एक किंमती दुचाकी चोरी केल्याची कबूली दिली. त्यावरून त्या चोरीच्या दोन दुचाक्या जप्त करण्यात आल्या असल्याचे सांगितले.

Related Stories

मांडेदुर्ग येथे भीषण आगीत गवत गंज्या जळून खाक

Abhijeet Shinde

महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांचा राजीनामा

Abhijeet Shinde

चंदूरातील दोन्ही राजकीय गटात वादावादी

Abhijeet Shinde

गोकुळची गरज ओळखूनच जागा खरेदी – चेअरमन विश्वास पाटील

Abhijeet Shinde

गव्याचे कोल्हापुरात ठाण, प्रशासन लागले कामाला

Abhijeet Shinde

शियेमार्गे चौपदरीकरणाला विरोध

Abhijeet Shinde
error: Content is protected !!