तरुण भारत

इथॅनला राष्ट्रीय रौप्य; विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत खेळण्याची मिळविली पात्रता

क्रीडा प्रतिनिधी /मडगाव

गोव्याच्या इथॅन वाझने 10 वर्षांखालील राष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत रौप्यपदक मिळविले आणि विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत खेळण्याची पात्रता मिळविली. गोव्याच्या या कुमार बुद्धिबळपटूचे राष्ट्रीय सुवर्णपदक मात्र थोडक्यात हुकले. इथॅन हा राय येथील असून सां जुझे दी आरियाल येथील किंग्स स्कूलमध्ये पाचवीच्या वर्गात शिकत आहे.

Advertisements

मडगाव येथील चेस गुरु गोवा अकादमीत प्रकाश सिंग यांच्याकडे प्रशिक्षण घेणारा 9 वर्षीय इथॅन वाझ या स्पर्धेत अपराजित राहिला. त्याने 11 राऊंडमध्ये 10.5 गुणांची कमाई केली. त्याचे आणि चांगल्या टायब्रेकरवर सुवर्णपदक मिळविलेल्या रेयान यांचे समान गुण झाले. या स्पर्धेत देशभरातील 929 कुमार बुद्धिबळपटू सहभागी झाले होते.

आता उपविजेतेपदाने इथॅनची ऑगस्टमध्ये होणाऱया फिडे ऑनलाईन रॅपीड विश्वचषक स्पर्धेतील कॅडेट्स आणि यूथ 10 वर्षांखालील विभागातील भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. गेल्या महिन्यात इथॅन वाझने सलग तिसऱयांदा राज्य बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते आणि राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळविली होती.

इथॅन वाझच्या राष्ट्रीय पातळीवरील कामगिरीचे गोव्याचे वीजमंत्री आणि गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नीलेश काब्राल यांनी अभिनंदन केले आहे. 900 हून अधिक बुद्धिबळपटूंमधून दुसरे स्थान मिळविणे, हे गोव्यासाठी निश्चितच गौरवास्पद असल्याचे काब्राल म्हणाले. इथेनच्या यशाचे गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव किशोर बांदेकर यांनीही कौतुक केले असून आमच्या संघटनेसाठी ही एक अभिमानास्पद बाब असल्याचे बांदेकर म्हणाले. 2019 मध्ये झालेल्या पश्चिम आशियाई बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत प्रत्येकी एक सुवर्ण आणि रौप्यपदक मिळविलेला इथॅन ऑगस्टमध्ये होणाऱया फिडे विश्वचषक स्पर्धेतील कॅडेट्स आणि यूथ गटातही पदके मिळविल, असा आशावाद किशोर बांदेकर यांनी व्यक्त केला.

Related Stories

तुमचा फोन खाली ठेवा आणि डिजिटल मुक्ती मिळवा : दिग्दर्शक जेन्स म्युरर

Abhijeet Shinde

‘प्रशासन आपल्या दारात’ हा निवडणुकीचा स्टंट नव्हे

Patil_p

आयएसएलमध्ये आज ब्लास्टर्स-चेन्नईन लढत प्रतिष्ठतेसाठी महत्वाची

Patil_p

आगामी निवडणुकीचा विचार करून गोव्यातील लसीकरणास प्राधान्य हवे

Amit Kulkarni

कोलवाळ जेलमध्ये कोविड 19 रुग्ण आढळला

Patil_p

बेशिस्त पार्किंग केल्यास कठोर कारवाई

Patil_p
error: Content is protected !!