तरुण भारत

धारगळ येथील आयुष्य इस्पितळ आणि महाविद्यालय प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम आठ महिन्यात पूर्णत्वास : केंद्रीय मंञी श्रीपाद भाऊ नाईक

प्रतिनिधी /पेडणे

सुकेकुळण धारगळ येथे आयुष इस्पितळाचे पहिल्या टप्प्याचे काम येणाऱया आठ महिन्यात पूर्ण होणार असून सुमारे पाचशे कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱया  या  प्रकल्पावर 80 टक्के गोव्यातील नागरिकांना नोकऱयामध्ये  प्राधान्य देण्यात येईल. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सरकारने आणि आरोग्य खात्याने सर्वतोपरी प्रयत्न जोमाने सुरू केले असून येणाऱया काळात यावर नियंत्रण मिळणार आहे. सर्वांनी कोरोना  लस घेऊन आपले आरोग्य सांभाळावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री तथा उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी  केले.

Advertisements

   ड़ सुके कुळण धारगळ येथे आयुष इस्पितळाचे प्रकल्पाचे  काम करत असलेले सुमारे साडे पाचशे कर्मचारी यांना कोरोनाची पहिली लस घेण्याच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक बोलत होते. यावेळी धारगळ पंचायतीचे सरपंच  सुभाष  धारगळकर,  भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस,  माजी सरपंच तथा विद्यमान पंच भूषण नाईक, माजी पंच सज्जन कोनाडकर, ,माजी पंच प्रमोद साळगावकर आदी उपस्थित होते.

ड़  यावेळी बोलताना श्रीपाद नाईक म्हणाले की, कोरोनाचे महा संकटात कोणालाही त्रास होऊ नये, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य खाते आणि आयुषतर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला असून धारगळ  येथील या प्रकल्पावर सुमारे साडे पाचशे ते सहाशे कर्मचारी काम करत आहे. या प्रकल्पावर काम करणाऱया कर्मचाऱयांना याचा प्रादुर्भाव होऊ नये, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ही लसीकरण मोहीम हाती घेण्यात असल्याचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले.

आठ महिन्यात आयुष इस्पितळाचे काम पूर्णत्वास येणारः श्रीपाद नाईक

यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की, सुमारे आठ महिन्यानंतर या इस्पितळ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वास येणार असून या प्रकल्पावर सर्वप्रथम ओपीडी,शंभर खाटांचे इस्पितळ तसेच पदव्युत्तर शिक्षण तसेच आरोग्य पर्यटन याला  चालना देण्यासाठी आणि त्या दृष्टीने या ठिकाणी काम हाती घेण्यात येणार असून हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचा  केंद्र सरकारचा आणि आयुष विभागाचा मानस असल्याचे यावेळी श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

स्थानिकांना प्रकल्पावर रोजगार द्या

यावेळी धारगळचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच भूषण नाईक तसेच पेडणे भाजप मंडळाचे अध्यक्ष तुळशीदास गावस यांनी श्रीपाद नाईक यांना प्रकल्पावर स्थानिकांना कोणत्याच प्रकारचे आतापर्यंत कंपनीने रोजगार दिल्या नसल्याचे निदर्शनास आणून दिले असता केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले की आपण आता आज राजेंद्र आर्लेकर यांच्या राज्यपाल पदाच्या शपथविधी कार्यक्रमासाठी दिल्लीत लवकर जावे लागत असून आपण परत या आठवडय़ात येऊन तुमच्या बरोबर चर्चा करणार तसेच कंपनीचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करून प्राधान्यक्रमाने स्थानिकांना नोकऱया देण्यावर आपण भर देणार असल्याचे यावेळी श्रीपाद नाईक यांनी आश्वासन दिले.

Related Stories

आधी खर्च करा, नंतर परतावा

Amit Kulkarni

कोरोना : कोकण रेल्वेकडून मदतनिधी

Patil_p

नागरिकत्व कायदय़ासंबंधी होणाऱया गैरप्रचाराला जनतेने बळी पडू नये

Patil_p

आल्मेदानी नगरविकासमंत्र्यांवर डागली तोफ

Amit Kulkarni

राज्य सरकार कोरोनाच्या धंध्यात व्यस्त

Omkar B

अटल सेतूवर अपघातात आरटीआय कार्यकर्ते राजेंद्र घाटे जबर जखमी

Amit Kulkarni
error: Content is protected !!