तरुण भारत

आपतर्फे राजकारणावरील संगीत चित्रफितीचे प्रकाशन

प्रतिनिधी /पणजी

आम आदमी पक्षातर्फे ‘चला गोव्यातील राजकारण साफ करूया’ या मोहिमेचे संगीत चित्रफितीचे प्रकाशन करण्यात आले. काँग्रेसकडून भाजपमध्ये बेडकासारख्य़ा उडी मारणाऱया 10 काँग्रेस आमदारांवर यात टीका करण्यात आली आहे. 3 जुलैपासून सुरू झालेल्या या मोहिमेला 50 हजाराहून अधिक गोमंतकीयांचा पाठिंबा मिळाला आहे.

Advertisements

आमदारांनी त्यांच्या भावनांसोबत केलेला खेळ पाहून गोमंतकीय कंटाळले आहेत. या मोहिमेतून विश्वासघातकी आमदारांचा खरा चेहरा उघडकीस आणण्याचा उद्देश आहे. या घातकी आमदारांनी फक्त आपली मते विकली नाही तर गोव्याला गंभीर भ्रष्टाचाराकडे ढकलले आहे. त्यामुळे गोमंतकीयांनी एकत्र येऊन भाजप आणि काँग्रेसपासून गोव्याला सुरक्षित करणे आवश्यक आहे असे आवाहन आपच्या सहसंयोजिका प्रतिमा कुतिन्हो यांनी पणजीत आयोजित केलेल्या या प्रकाशन सोहळय़ात बोलताना केले.

भाजपा सरकारने जे गोमंतकीयांसाठी करणे आवश्यक होते ते आप करत आहे. काँग्रेससुद्धा या कोरोना काळात गोमंतकीयांकडे पोहोचला नाही. त्यांना फक्त पैशांची देणेघेणे आहे गोमंतकीयांच्या भावना त्यांना महत्त्वाच्या नाहीत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत त्यांना धडा शिकविणे आवश्यक आहे असे कुतिन्हो यांनी सांगितले.

Related Stories

अन् विश्रांतीच्या हातून घडले अपहरणाचे कृत्य

Amit Kulkarni

एकसंध नसल्यानेच भंडारी समाजाचा गैरफायदा

Amit Kulkarni

काँग्रेस आता शिवसेनेशी युतीच्या तयारीत

Amit Kulkarni

ऑक्सिजनअभावी सरकारचाही गुदमरतोय श्वास

Amit Kulkarni

जलवाहिनी फुटल्याने वेळूस येथे दिवसभर पिण्याच्या पाण्याची गैरसोय

Amit Kulkarni

मुंडकारी खटले जलदगतीने निकाली काढा

Omkar B
error: Content is protected !!