तरुण भारत

”मुख्यमंत्र्यांना दिलीप कुमार यांच्या घरी जाण्यास वेळ मात्र लोणकरच्या आईला भेटायला वेळ नाही”

मुंबई \ ऑनलाईन टीम

बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांचं बुधवारी वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झालं. हिंदूजा रुग्णालयात सकाळी ७.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी विविध क्षेत्रातील व्यक्ती तसेच राजकीय नेतेही त्यांच्या घरी पोहोचले होते. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश होता. यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारच्या अपयशामुळे मृत्यू झालेल्या स्वप्निल लोणकरच्या आईलाही ते भेटायला गेले असते अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना तिथे जाण्यासाठी वेळ नाही, मात्र येथे जाण्यासाठी पूर्ण वेळ होता. दुख:द पण हे सत्य आहे असं म्हणत नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांचं सांत्वन करतानाचा फोटोही शेअर केला आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकरने या तरुणाने आत्महत्या केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोणकर कुटुंबियांची भेट घेतली नाही. यावरुन नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

Advertisements

Related Stories

चालत्या कारचा स्फोट होऊन चालकाचा होरपळून मृत्यू

Sumit Tambekar

ग्रंथालयातून लोकशाहीवादी पुस्तके हटवा, हाँगकाँग प्रशासनाचे आदेश

datta jadhav

पदवीचे शिक्षण घेणारा ‘हा’ गँगस्टर आहे कोण?

Abhijeet Shinde

पंतप्रधानांची युरोपीयन युनियनशी चर्चा

Abhijeet Shinde

कळंबेत रिक्षाने ठोकरल्याने चिमुकलीचा मृत्यू

Patil_p

कंटेनमेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवांना सवलत

Patil_p
error: Content is protected !!