तरुण भारत

काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेच्यावतीने रास्ता रोको

राधानगरी / प्रतिनिधी

दुधगंगा धरण प्रकल्पासाठी ताब्यात घेतलेली उर्वरित ५२९ हेकटर जमीन वनविभागाला देण्यात आली,वनविभागाकडून १६१ हेकटर जमिनीचे पैसे धरणग्रस्तांना दिलेत परंतु ३३२ हेकटर क्षेत्राचे पैसे गेली पस्तीस वर्षे संघर्ष करूनही प्रकल्प ग्रस्तांना अध्याप दिलेले नाहीत, हे पैसे त्वरित द्यावेत या मागणीसाठी काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेच्या वतीने आज निपाणी देवगड महामार्गावर रास्ता रोको करत राधानगरी वन्यजीव कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले

Advertisements

दुधगंगा धरणाच्या पाण्याच्या पातळीबाहेरील जमीन वनविभागाला देण्यात आली होती. वनविभागाने उर्वरित जमिनीची रक्कम बाजारभावाच्या चारपट रक्कम त्वरित देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी सकाळी अकरा वाजता रास्ता रोको केला. राधानगरी पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे कृष्णात यादव यांनी आंदोलन धरणग्रस्तांना रास्ता रोको थांबवण्याची विनंती केल्यानंतर अर्धा तासाने आंदोलकांनी वन्यजीव कार्यलयासमोर धरणे धरले. यावेळी आंदोलक प्रतिनिधी बरोबर वन्यजीवचे वनक्षेत्रपाल एन एस कांबळे,प्रादेशिक वनविभागाचे वनक्षेत्रपाल बी एस बिराजदार यांनी आपल्या कार्यालयाकडून सर्व बाबींची पूर्तता केली असल्याचा खुलासा करत. प्रकल्प अधिकारी उपवन संरक्षक कोल्हापूर यांच्या कार्यालयात प्रकल्प अहवाल गेला असल्याचे स्पष्ट केलं. यावेळी धरणग्रस्तांनी येत्या सहा महिन्यात पूर्तता न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल घोणसालविस,उपाध्यक्ष रघुनाथ चौगले, बाबुराव पाटील,विठ्ठल चव्हाण, नाथा पाटील, विजय झंजे, विलास मर्दाने प्रकाश कांबळे, विठ्ठल पाटील यांच्यासह धरणग्रस्तांनी सहभाग घेतला होता.

Related Stories

गिर्यारोहक सागर नलवडे “ब्रॅन्ड कोल्हापूर” पुरस्काराने सन्मानित

Abhijeet Shinde

हातकणंगलेतील भादोलेत अलगीकरणात असलेली महिला कोरोना पॉझिटीव्ह

Abhijeet Shinde

कोल्हापूर : गॅस दरवाढीमुळे ग्रामीण भागात लोकांचा कल चुलींकडे

Abhijeet Shinde

पत्नीचा छळ केल्याप्रकरणी : पोलीस उपनिरीक्षकासह सासू, ननंद, मित्रावर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना सक्रीय रुग्णसंख्या 48 वर; प्रादूर्भाव झाला कमी

Sumit Tambekar

कोल्हापूर : बाजार समित्या बंद होणार नाहीत – केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!