तरुण भारत

शेगाव येथे बंद घर फोडून ३ लाख ८० हजारांची चोरी

प्रतिनिधी /जत

जत तालुक्यातील शेगाव येथील कापड व्यापारी विनोद विलास भोईटे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३ लाख८० हजार रुपयांचा सोने-चांदी व रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला. ही घटना गुरुवारी रात्री घडली.

Advertisements

काल रात्री भोईटे कुटुंबीय आपल्या शेताकडे गेले होते, सकाळी घरी येऊन पाहिले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनतर भोईटे यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. बंद घराचे कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. चोरट्यांनी कपाटातील १ लाख ७० हजार रुपये किंमतीच्या तीन तोळ्यांच्या तीन अंगठ्या, १० हजार रुपयांची चांदीची नाणी व रोख रक्कम असे मिळून ३ लाख ८० हजार रुपये असा मुद्देमाल लंपास केला आहे.

दरम्यान, चोरटे चोरी करून जात असताना शेगाव येथील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यातील वर्णनानुसार एकास जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चोरीननंतर श्वान पथक बोलविले होते. मात्र चोरटे वाहनाने गेल्याने श्वान तेथेच घुटमळले. संशयिताची कसून चौकशी सुरू असून पोलिसांचे पथक तपासासाठी बाहेरगावी पाठविण्यात आले आहे.

Related Stories

आमदार गोपीचंद पडळकर कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

सांगली : कुपवाड येथे आठ लाखाच्या विदेशी मद्यावर चोरटयांचा डल्ला

Abhijeet Shinde

सांगली : बँक कर्मचाऱ्यांचा असाही प्रामाणिकपणा

Abhijeet Shinde

सांगली : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात अतिरिक्त निर्बंध लागू

Sumit Tambekar

सांगली : शाळा व्यवस्थापनांकडून पालकांची होणारी लूट थांबवा

Abhijeet Shinde

सांगली : आता वीजेची स्मार्ट प्रीपेड मीटर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!