तरुण भारत

सीबीआय मुख्यालयात आगीची दुर्घटना

बेसमेंटमधील इलेक्ट्रॉनिक यंत्रसामग्री भक्ष्यस्थानी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

नवी दिल्लीमधील लोधी रोडवर असलेल्या सीबीआय मुख्यालयातील पार्किंग परिसरात गुरुवारी सकाळच्या सुमारास आग लागली. ही आग बेसमेंटमधील इलेक्ट्रॉनिक रुमला लागल्याची माहिती मिळाली आहे. आग लागल्यानंतर काही वेळात भीषण आगीचे लोळ दिसू लागल्याने सर्वच यंत्रणांची धावपळ उडाली. अग्निशमन दलाच्या सहा गाडय़ांच्या मदतीने काही वेळातच आग नियंत्रणात आणण्यात आली. आग लागल्याचे समजताच सर्व अधिकारी कार्यालयाबाहेर पडल्यामुळे गोंधळ उडाला. या आगीत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, इलेक्ट्रॉनिक रुममधील यंत्रसामग्री आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने आर्थिक नुकसान झाले.

आग तातडीने नियंत्रणात आणण्यात आली असली तरी ती नेमकी कशामुळे लागली याचे कारण समोर आले नाही. प्राथमिक निदानानुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे. आगीत बेसमेंटमधील एसी प्लान्टचे मोठे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. मात्र, सुदैवाने बेसमेंटमध्ये पार्क करण्यात आलेली सर्व वाहने सुरक्षित राहिली

Related Stories

गुजरात उच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांचा शपथविधी

Patil_p

कोरोना : दिल्लीत रुग्णांनी ओलांडला 6.37 लाखांचा टप्पा

Rohan_P

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती नाजूक

Rohan_P

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल – डिझेलच्या दरात वाढ; ‘हे’ आहेत नवीन दर

Rohan_P

सुनावणीच्या मुद्यांवर गुरुवारी निर्णय देणार

Patil_p

नदीत बुडालेल्यांचा शोध घेणारे उपकरण

Patil_p
error: Content is protected !!