तरुण भारत

जेफ बेझोस ठरले सर्वात श्रीमंत व्यक्ती

 ब्लूमबर्ग बिलिनेअरची यादी जाहीर : बेझोस सीईओपदावरुन निवृत्त

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisements

जगातील सर्वाधिक संपत्ती कोणाजवळ आहे? असा प्रश्न कोणी विचारला तर आता बिनधास्तपणे जेफ बेझोस यांचे नाव घेतले जाणार आहे. कारण यावेळी जेफ  बेझोस यांनी एक नवा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. बेझोस यांच्याकडे आता 15.74 लाख कोटी रुपयांची (211 अब्ज डॉलर) संपत्ती असल्याची माहिती ब्लूमबर्ग बिलिनेअर्सच्या निर्देशांकानुसार देण्यात आली आहे.

ऍमेझॉन.कॉम(AMAZON.COM) इंकचे समभाग 4.7 टक्क्यांनी वाढल्याने बेझोस यांची संपत्ती वधारली आहे. पेंटागॉनने मायक्रोसॉफ्ट कॉर्पसोबत क्लाउड कंप्युटिंग कॉन्ट्रक्ट रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. याचाच परिणाम म्हणून बेजोस हे संपत्तीत अव्वल ठरले आहेत.

पेंटागॉनचे म्हणणे आहे, की व्यवहारासोबत सरकार आणि काही मोठय़ा अमेरिकन टेक कंपन्या यांच्यामध्ये खूप वर्षांपासून कटकटी निर्माण झाल्या होत्या. यातूनच मायक्रोसॉफ्ट कॉर्पचे 2019 मध्ये 10 अब्ज डॉलरच्या क्लाउड कंप्युटिंग कॉन्ट्रक्ट रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

बेझोस यांचा कंपनीतील हिस्सा

वय वर्ष 57 असणाऱया बेझोस यांनी 27 वर्षांच्या अखंड परिश्रमातून उभारलेल्या ऍमेझॉन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ)पद 5 जुलैला अधिकृतरित्या सोडले आहे. परंतु पदभार सोडला असला तरी कंपनीत 11 टक्क्यांच्या हिस्सेदारीची मालकी बेझोस यांच्याकडेच राहणार आहे. ते फर्मचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम करत आहेत.

जगातील प्रमुख श्रीमंत व्यक्ती लाख कोटी रुपयामध्ये

नाव                  संपत्ती

  • जेफ बेझोस…….. 15.74
  • एलॉन मस्क……. 13.50
  • बर्नार्ड अर्नाल्ट…. 12.60
  • बिल गेट्स……… 10.96
  • मार्क झुकरबर्ग…. 9.77
  • मुकेश अंबानी….. 5.98

स्रो : ब्लूमबर्ग बिलिनेअर निर्देशांक

Related Stories

इंडियन ऑईलची कच्च्या तेलाची क्षमता वाढली

Patil_p

आयुष्याच्या तीन टप्प्यांवर करावयाची गुंतवणूक

Patil_p

ई-कॉमर्स क्षेत्रात मजबूत तेजीचे संकेत

Amit Kulkarni

प्राप्तीकरकडून आतापर्यंत 1.23 लाख कोटींचा परतावा

Patil_p

ऍपलकडून न्यूयॉर्कसह अन्य शहरांमधील स्टोअर राहणार बंद

Patil_p

आल्टो 16 व्या वर्षीही बेस्ट कार

Patil_p
error: Content is protected !!