तरुण भारत

केरळमध्ये आढळला ‘झिका’ विषाणूचा पहिला रुग्ण

  • 24 वर्षीय गर्भवती महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह


ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


केरळमध्ये अजूनही कोरोना विषाणूचे संक्रमण चिंताजनक स्थितीमध्ये असतानाच केरळवर आणखी एका विषाणू आढळला आहे. केरळमध्ये झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला असल्याची माहिती केरळचे आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली.

Advertisements


याबाबत अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या, राज्यात एका 24 वर्षीय गर्भवती महिला झिका विषाणू संक्रमित आढळली आहे. याचसोबत, मच्छरांमुळे फैलावणाऱ्या झिका विषाणूचे संक्रमण देशात पहिल्यांदाच समोर आले आहे. 


तिरुअनंतपुरममधून झिका विषाणूचे आणखी 13 संशयित रुग्ण असल्याचे समोर येत आहे. या रुग्णांच्या चाचणीसाठी नमुने घेऊन ते पुण्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’ला पाठवण्यात आले असून चाचणीचे निकाल आल्यानंतर संक्रमणाची पुष्टी केली जाऊ शकेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 


रुग्णालयात करण्यात आलेल्या चाचणीत महिला झिका विषाणू संक्रमित असल्याचे समोर आले. त्यानंतर चाचणीचे नमुने चाचणीसाठी एनआयव्ही, पुण्याला पाठवण्यात आले. सध्या महिलेची प्रकृती  स्थिर आहे. उल्लेखनीय म्हणजे, या गर्भवती महिलेने गेले अनेक महिने राज्यातून बाहेर प्रवास केलेला नाही.


झिका विषाणूची लक्षणे : 


झिका संक्रमणाची लक्षणे डेंग्यू समान असतात. यामध्ये ताप, त्वचेवर लाल रंगाचे डाग, सांधे दुखी तसंच डोळे लाल होणे अशी अनेक लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येतात.


झिका विषाणू संक्रमित व्यक्तीमध्ये सात ते आठ दिवस या संक्रमणाच्या प्रभावाखाली राहतो. गर्भवती महिलांना झिका विषाणू संक्रमणाचा अधिक धोका आहे. यामुळे जन्माला येणारे मूल अविकसित मेंदूसहीत जन्माला येण्याचा धोका अधिक असतो.

Related Stories

उध्दव ठाकरेंनंतर आता आदित्य ठाकरेंशी राहुल गांधींनी केली चर्चा; मुंबईतील कोरोना रोखण्यासाठी दिला ‘हा’ सल्ला

Rohan_P

14.80 लाख रुग्ण आतापर्यंत ‘कोरोना’मुक्त

Patil_p

अदर पूनावाला धमकी प्रकरणावर संजय राऊत म्हणाले…

Abhijeet Shinde

पेट्रोल-डिझेल 6 ते 8 रूपयांनी होऊ शकते स्वस्त

Patil_p

यथोचित कारवाईची पूर्ण मुभा

Patil_p

दिल्लीत कोरोना रुग्ण संख्येने ओलांडला 4 लाखांचा टप्पा

Rohan_P
error: Content is protected !!