तरुण भारत

सांगली :`त्या’एमडी डॉक्टराचा जामीन फेटाळला

डॉक्टर फरार, मिरजेतील आणखी दोघा एमडी डॉक्टरांची चौकशी होणार

प्रतिनिधी / मिरज

Advertisements

अपेक्स प्रकरणी डॉ. महेश जाधवला सहकार्य करणाऱ्या सांगलीतील छातीरोग तज्ञ डॉ. शैलेश बरफे यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. सलग तीन दिवसांनंतर सुनावणी होऊन अखेर न्यायालयाने अंतरिम सुनावणी देऊन तो फेटाळाल्याने डॉ. बरफेच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, तो फरार झाल्याची माहिती म. गांधी चौकी पोलिसांनी दिली आहे. याच प्रकरणी मिरजेतील आणखी दोघा डॉक्टर्सची चौकशी होणार आहे. दरम्यान, 13 मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉ. जाधव विरोधात पोलिसात तक्रार दिल्याने तक्रारदारांची संख्या 30 वर पोहचली आहे.

205 पैकी 87 कोरोना रुग्णांच्या मृत्यूस कारण ठरल्याप्रकरणी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल असलेल्या डॉ. जाधवचे अनेक कारनामे पुढे येऊ लागल्याने `अपेक्स’ची व्याप्ती वाढत आहे. जाधवचा भाऊ, रुग्णालयातील अकौंटंट, तंत्रज्ञासह रुग्णवाहिका चालकांनाही अटक केली होती. जाधवने सांगली-मिरजेतील काही एमडी डॉक्टरांना कागदोपत्री नियुक्ती केल्याचे तपासातून समोर आले होते. त्यामुळे त्यांचीही चौकशी करण्यात येत आहे.

सांगलीतील छातीरोगतज्ञ डॉ. शैलेश बरफे हा जाधवला सहकार्य करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या अटकेची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली होती. त्यामुळे बरफेने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. वकिलांचे आणि पोलिसांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सलग तीनवेळा सुनावणी पुढे ढकलली होती. अखेर गुरूवारी जामीनावर सुनावणी होऊन न्यायालयाने तो फेटाळून लावल्याने बरफेच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, जामीन फेटाळताच तो फरारी झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मिरज शहरातील आणखी दोघा डॉक्टरांचीही चौकशी होणार असून यापूर्वी दोघांचे जबाब नोंदविले आहेत. आता आणखी डॉक्टर रडारवर आल्याने एकूण पाच एमडी डॉक्टरांचा सहभाग स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे.

आणखी 13 नातेवाईकांच्या तक्रारी

जाधव आणि रुग्णालय प्रशासनाविरोधात रुग्णांच्या नातेवाईकांकडून स्वतंत्र तक्रारी दाखल करण्यासह त्यांचे जबाब घेतले जात आहेत. यापूर्वी 17 मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी अधिकृत तक्रार देऊन अपेक्समधील उपचाराबाबत संशय व्यक्त केला आहे. आता त्यात 13 नातेवाईकांची भर पडल्याने तक्रारदारांची संख्या 30 वर पोहचली आहे. अपेक्समध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी संशय असल्यास पुढे येऊन तक्रारी द्याव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related Stories

सांगली : लेखक-कवी,गिर्यारोहक आपल्या भेटीला, मराठी अध्यापक संघाचा उपक्रम

Abhijeet Shinde

शिराळा येथे वारणा काठच्या गावाना यांत्रिकी बोटी प्रदान

Abhijeet Shinde

सांगली : मिरजेत लॉकडाऊनच्या भीतीने बाजार पेठ फुल्ल

Abhijeet Shinde

पुरग्रस्तांना मदतीचे पॅकेज जाहीर न झाल्यास तहसिलदार कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा नेणार : मारुती चव्हाण

Abhijeet Shinde

शिवाजी विद्यापीठ अंतर्गत गुरूवारपासून ऑनलाईन परीक्षा

Abhijeet Shinde

अवकाळी पावसाने मणेराजूरीसह तासगांव तालुक्यातील द्राक्ष शेती उध्वस्त !

Sumit Tambekar
error: Content is protected !!