तरुण भारत

मनपाची अंतिम मतदारयादी आज होणार प्रसिद्ध

प्रतिनिधी / बेळगाव

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्डनिहाय तात्कालिक मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पण मतदारयादीत नावे नसल्याच्या, चुकीची नावे नोंद झाल्याबाबत आणि चुकीच्या वॉर्डमध्ये नाव असल्याबाबतच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. हरकतीचे निरसन करून शुक्रवार दि. 9 रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Advertisements

महापालिका वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणाबाबतचा वाद अद्यापही निकालात निघाला नाही. पण निवडणूक घेण्याच्यादृष्टीने निवडणूक आयोगाने आवश्यक तयारी चालविली आहे. कोरोनामुळे मतदारयादी प्रसिद्ध करण्याचे रखडले होते. पण अनलॉक होताच तात्कालिक मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत आक्षेप नोंदवून घेण्यात आले असून तीसहून अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱयांनी दिली. सदर तक्रारींची दखल घेऊन मतदारयादीतील चुकांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसेच शुक्रवार दि. 9 रोजी महापालिकेची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

एकीकडे वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणाचा वाद उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. दुसरीकडे आरक्षण, मतदारयादी निश्चित करून निवडणुका घेण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे न्यायालयातील याचिकेचा निकाल कधी लागणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. तसेच न्यायालयाचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार याकडेदेखील शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

अधिवेशनानंतर आजी-माजी मुख्यमंत्र्यांत जुंपली

Amit Kulkarni

स्मार्ट सिटीच्या कामांबाबत तीव्र संताप

Amit Kulkarni

विधानपरिषद निवडणुकीसाठी 8,875 मतदार

Amit Kulkarni

मच्छेत घर कोसळून दीड लाखाचे नुकसान

Amit Kulkarni

कोरोनाकाळातही पोस्टाची सेवा कौतुकास्पद

Amit Kulkarni

बेळगावच्या श्रेया पोटेची क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी

Amit Kulkarni
error: Content is protected !!