तरुण भारत

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या 7 जागा वाढणार

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

जम्मू-काश्मीरमध्ये हद्दवाढीनंतर विधानसभेच्या 7 जागा वाढतील. विधानसभेत 83 जागांऐवजी 90 जागा मिळण्याची ही प्रक्रिया मार्च 2022 पर्यंत पूर्ण होईल. हद्दवाढ आयोगाच्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. 

Advertisements

जम्मू-काश्मीरच्या हद्दवाढ आयोगाच्या अध्यक्षा रंजना प्रकाश देसाई आणि मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा म्हणाले, जम्मू-काश्मीरमधील विधानसभा मतदारसंघांची हद्दवाढ स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने केली जाईल. ही एक घटनात्मक प्रक्रिया आहे आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना कायद्यांतर्गत हद्दवाढ कायद्याने विहित केलेली प्रक्रिया आहे. 

2011 च्या जनगणनेच्या आधारे ही हद्दवाढ होईल. हद्दवाढीचा मसुदा जनतेसमोर ठेवला जाईल. जनतेच्या सूचनांचा समावेश करून अंतिम मसुदा समोर येईल, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

स्वयंचलित मेट्रो सेवेचा दिल्लीत शुभारंभ

Patil_p

भारतात 5 लाखांहून अधिक कोरोनाबाधित

datta jadhav

दिल्लीतील आयडीएसचे नाव बदलण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

tarunbharat

रजनीकांत यांच्या विरोधात निदर्शने

Patil_p

जगाला दिशा देण्यासाठी भारताला सशक्त, आत्मनिर्भर होण्याची गरज

datta jadhav

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज विद्यापीठाची कोनशीला

Patil_p
error: Content is protected !!