तरुण भारत

ऑनलाईन वॉलेटमुळे शॉपिंग करणे झाले सोपे

ब्लॅक हॉक कंपनीच्या अहवालामधून माहिती – भारत मोबाईल विक्रीत अव्वलस्थानी 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

कोरोना संसर्गामुळे देशात ऑनलाईन शॉपिंग करण्यास मोठय़ा प्रमाणात चालना मिळत आहे. याच दरम्यान ऑनलाईन शॉपिंग करणाऱयांचा एक सर्व्हे जगभरात पेमेन्ट सुविधा देणारी कंपनी ब्लॅक हॉक यांनी केला आहे.

ब्लॅक हॉक कंपनीच्या माहितीनुसार 10 मधील 9 भारतीयांनी डिजिटल वॉलेटच्या आधारे शॉपिंग करणे अगदी सहज व सोपे असल्याचे नमूद केले आहे. ज्यांचा सर्व्हे करण्यात आला त्यातील 98 टक्के लोक 12 महिने फक्त ऑनलाईन शॉपिंग करत असल्याची माहिती समोर आली आहे.

डिजिटल पेमेन्टमुळे अधिकचा खर्च

सदरच्या सर्व्हेमध्ये 13,000 ग्लोबल शॉपर्समध्ये 69 टक्के जणांनी डिजिटल पेमेन्ट घेणाऱया दुकानांमध्ये साहित्याची खरेदी केली आहे. ज्या ठिकाणी डिजिटल पेमेन्टची सुविधा नसते, तेथे साहित्याची खरेदी करण्यात आली नसल्याची माहिती नोंदवण्यात आली आहे. भारत दुसऱया देशांच्या तुलनेत मोबाईल विक्रीत सर्वात पुढे आहे. 54 टक्क्यांपेक्षा अधिक लोकांचे मानणे आहे, की डिजिटल पेमेन्टचा पर्याय मिळाल्यावर ग्राहकांकडून अधिक प्रमाणात खर्च झाल्याची माहितीही समोर आली आहे.

Related Stories

बँकांसमोर आता टेक कंपन्यांचे आव्हान

Patil_p

आयसीआयसीआय देणार कोटीपर्यंतचे शैक्षणिक कर्ज

Patil_p

शेअर बाजारात ‘मुहूर्ता’वर दिवाळी

Patil_p

हेक्सागॉन न्युट्रीशनचा येणार आयपीओ

Patil_p

फ्लिपकार्ट-ऍमेझॉनचा रिपब्लिक सेल

Patil_p

नोव्हेंबरमध्ये वीज वापर वाढला

Patil_p
error: Content is protected !!