तरुण भारत

पैलवान ते डॉक्टरेट – एक प्रेरक प्रवास

हरियाणा या राज्यात महिला कुस्तीवीरांचे प्रमाण देशात सर्वात अधिक आहे. तेथे पुरुषांच्या बरोबरीने महिला कुस्तीपटू आहेत. अशाच एका कुस्तीपटूची ही प्रेरणादायी कहाणी आहे. त्यांचे नाव अनमोल सिंग असे आहे. 1989 मध्ये जन्मलेल्या अनमोल यांनी बालपणी आणि तारुण्यात कुस्ती हे आपले करिअर मानले होते. या क्षेत्रात त्यांची प्रगतीही स्पृहणीय होती. स्थानिक आणि राज्य पातळीवर त्यांचे नाव झाले होते. त्यांनी चौदा पदके जिंकून आपले कुस्तीकौशल्य सिद्ध केले होते. तथापि, एका अपघातात त्यांच्या गुडघ्याला जखम झाल्याने त्यांना हे करिअर सोडावे लागले. मात्र, त्यांनी हार न मानता आपल्या बुद्धीच्या जोरावर अभ्यासाशी कुस्ती करण्याचा नवा उपक्रम हाती घेतला.

नाईलाजास्तव कुस्ती सोडावी लागल्यानंतर त्यांनी सर्व लक्ष अभ्यासावर केंद्रीत केले. उत्तम गुण मिळवून बी.कॉम. झाल्यानंतर एम.कॉम. केले. त्यानंतर त्यांनी हरियाणा नागरी सेवा परीक्षेत चांगली कामगिरी करून एसडीएम हे पद मिळविले. त्याचबरोबर शारीरिक शिक्षण या विषयात पी.एचडी करून डॉक्टरेटही मिळविली. युजीसीची परीक्षाही त्या उत्तीर्ण झाल्या. चौधरी देवीलाल विश्वविद्यालयात त्यांनी शारीरिक शिक्षण या विषयात पी.एचडी केली. त्यानंतर काही काळ प्राध्यापक म्हणून सेवा बजावून त्या एसडीएम पदावर सध्या काम करीत आहेत.

Advertisements

कुस्तीचे प्रशिक्षण अत्यंत कठोर असते. या प्रशिक्षणातच त्यांना जखम झाल्याने करिअर सोडावे लागले होते. मात्र, पैलवानांच्या प्रशिक्षणामध्ये कोणतीही सौम्यता आणण्यास त्यांचा तीव्र विरोध आहे. सौम्य प्रशिक्षण असल्यास पैलवान आंतरराष्ट्रीय पातळीवर टिकाव धरू शकणार नाहीत, या त्यांच्या मताचे कौतुक होत असते.

Related Stories

वाहत्या पाण्यात प्रतिबिंब पाहता येणारी नदी

Patil_p

राज्यात निम्मे रुग्ण संसर्गमुक्त

Patil_p

पंजाबमध्ये ‘कॅप्टन’विरोधी सूर तीव्र

Patil_p

दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारीला मतदान

prashant_c

6 लाख कोटींच्या संपत्तीनिर्माणाची योजना

Patil_p

चोवीस तासात ‘40 हजार’पार

Patil_p
error: Content is protected !!