तरुण भारत

ज्योतिरादित्य सिंदिया यांनी पदभार स्वीकारला

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

नूतन नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी आपल्या विभागाची सूत्रे शुक्रवारी हाती घेतली आहेत, असे त्यांच्या विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याच विभागाच्या राज्यमंत्री पदाचा भार जनरल व्ही. के. सिंग यांच्यावर सोपविण्यात आला आहे. त्यांनीही शुक्रवारीच सूत्रे स्वीकारली. सिंदिया यांनी पदभार स्वीकारताना माजी नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी उपस्थित होते. त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना सिंदिया यांना केल्याचे सांगण्यात आले. आपल्यावर या विभागाचे उत्तरदायीत्व सोपविल्यामुळे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारी आहोत. या विभागासमोर बरीच आव्हाने असून आपण ती सर्व शक्ती पणाला लावून स्वीकारण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन त्यांनी केले.

Advertisements

Related Stories

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला

datta jadhav

नरेंद्र मोदींचे नेतृत्व ‘विशी’मध्ये!

Omkar B

राम मंदिर : आरोप करणाऱ्यांनी पावती दाखवा अन् देणगी परत घेऊन जा – साक्षी महाराज

triratna

मोदी-ममता दोघेही निशाण्यावर

Patil_p

उत्तराखंडमधील परिस्थितीचा पंतप्रधान मोदी, शाह यांच्याकडून आढावा

datta jadhav

पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्याचा मोदींना सलाम

Patil_p
error: Content is protected !!