तरुण भारत

मनू साहनी यांचा राजीनामा

दुबई / वृत्तसंस्था

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे सीईओ मनू साहनी यांनी त्यांच्यावर सुरु असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या गैरहजेरीत जॉफ ऍलार्डाईस हंगामी सीईओ म्हणून काम पाहतील, असे आयसीसीने म्हटले आहे. साहनी यापूर्वी मार्चपासूनच सक्तीच्या रजेवर होते. 56 वर्षीय साहनी गतवर्षी नव्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु झाली, त्यावेळेपासून दडपणाखाली होते. साहनी हे सिंगापूर स्पोर्ट्स क्लबचे माजी सीईओ राहिले असून ईएसपीएन स्टार स्पोर्ट्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. याच कंपनीत ते 17 वर्षे कार्यरत होते. साहनी मँचेस्टर युनायटेड लिमिटेड कंपनीचे नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर व ऑडिट कमिटी मेम्बर आहेत.

Advertisements

Related Stories

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेला उद्यापासून प्रारंभ

Patil_p

व्हीनस विल्यम्सची ब्रिस्बेन स्पर्धेतून माघार

Patil_p

सुवर्णजेत्या बजरंगची शेवटच्या 30 सेकंदात मुसंडी

Patil_p

मेगा लिलावापूर्वी विराट, रोहित, धोनी आयपीएलसाठी ‘रिटेन’

Patil_p

तालिबानकडून अफगाण क्रिकेटच्या कार्यकारी संचालकाची हकालपट्टी

Patil_p

कर्णधार स्टीव्ह स्मिथला दंड

Patil_p
error: Content is protected !!