तरुण भारत

बिम्सला आणखी 11 लाखांची देणगी

उद्योजकांनी दिली आर्थिक मदत : प्रादेशिक आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (बिम्स) ला देणग्यांचा ओघ सुरूच आहे. प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक उद्योजकांनी 11 लाख 46 हजार रुपये आर्थिक साहाय्य केले आहे.

गुरुवारी बिम्समध्ये झालेल्या कार्यक्रमात उद्योजकांनी बिम्स प्रशासनाकडे धनादेश सोपविला. प्रादेशिक आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात प्रभारी वैद्यकीय संचालक डॉ. उमेश कुलकर्णी, मुख्य प्रशासकीय अधिकारी आफरीन बानू बळ्ळारी आदी उपस्थित होते.

उद्योजक दिलीप चिटणीस यांच्यासह वेगवेगळय़ा उद्योग व्यवसायातील उद्योजकांनी बिम्स प्रशासनाकडे धनादेश सुपूर्द केले. येथील श्रीनिवास इंडक्शन हार्डनिंग, शांती फोमॅक प्रा. लि., बेलगाम ऍक्वा वॉल्स प्रा. लि. क्वॉलिटी ऍनिमल प्रा. लि., मिलेनियम स्टार्च इंडिया प्रा. लि., हॅड्रोपॅक इंडिया प्रा. लि., एक्स्पर्ट वॉल्व ऍण्ड इक्मयुप्मेंट प्रा. लि. हिंडाल्को इंडस्ट्रीज लि., एकेपी फेरोकास्ट, एकेपी फौंड्रीज प्रा.लि., सर्वो कंट्रोल्स ऍण्ड हैड्रोलिक्स प्रा. लि., आरईसी फ्लो टेक्नॉलॉजीज, हॅलॉक हैड्रो टेक्निक प्रा. लि., एईपी प्रोडक्टस् प्रा. लि., बेळगाव जिल्हा ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन, बेळगाव जिल्हा क्वॉरी ओनर्स असोसिएशनने निधी दिला आहे.

Related Stories

सिद्धरामय्या कोरोना मुक्त, रुग्णालयातून डिस्चार्ज

Abhijeet Shinde

मुतगा येथे ता.पं.फंडातून साडेचार लाखांचा निधी

Patil_p

महानगरपालिकेचे दरवाजे नागरिकांसाठी बंद!

Patil_p

कर्नाटक: आरोग्य विभागाच्या कार्यालयातील वाहन चालकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

गरीबी रेषेखालील कोरोना बळींना मिळणार भरपाई

Amit Kulkarni

प्लास्टिक बंदी केवळ कागदावरच

Patil_p
error: Content is protected !!