तरुण भारत

शुक्रवारी 104 नवे रुग्ण, चार जणांचा मृत्यू

जिल्हय़ातील 57 जण झाले कोरोनामुक्त

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

जिल्हय़ात सक्रिय रुग्णसंख्येतील वाढ सुरूच आहे. शुक्रवारी ही संख्या 2 हजारांच्या घरात पोहोचली आहे. 104 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर चौघा जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हय़ातील 57 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.

चिकोडी तालुक्मयातील चौघे जण कोरोनामुळे दगावले आहेत. शुक्रवारी बेळगाव व चिकोडी या दोन्ही तालुक्मयात रुग्णसंख्या वाढत असून सौंदत्ती, बैलहोंगल तालुक्मयातील प्रत्येकी एक, हुक्केरी, खानापूर तालुक्मयात प्रत्येकी दोन व रायबाग तालुक्मयात तीन रुग्ण आढळून आले आहेत. अथणी तालुक्मयात 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

बेळगाव, चिकोडी वगळता इतर तालुक्मयात रुग्णसंख्या घटली आहे. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 76,787 वर पोहोचली आहे. 73 हजार 983 जणांनी कोरोनावर मात केली असून मृतांचा सरकारी आकडा 813 वर पोहोचला आहे. अद्याप 2 हजार 432 हून अधिक स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत.

विजयनगर-हिंडलगा, गौंडवाड, सुळगा, आझमनगर, भाग्यनगर, चव्हाट गल्ली, हिंदवाडी, रामनगर, जयनगर, कोरे गल्ली-शहापूर, महादेव गल्ली, मराठा कॉलनी, नेहरुनगर, राणी चन्नम्मानगर, रामतीर्थनगर, शास्त्राrनगर, टिळकवाडी, टी. क्ही. सेंटर, वैभवनगर, विनायकनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. हालभावी येथील आयटीबीपी कॅम्पमधील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Related Stories

गणेश ज्वेलर्स हुबळी टायगर्स, विश्रृत स्ट्रायकर्स विजयी

Patil_p

कंग्राळी खुर्द गावामध्ये औषध फवारणी

Patil_p

ई-केवायसीच्या मुदतीत पुन्हा वाढ

Amit Kulkarni

स्थलांतरितांसाठी विशेष रेल्वे सोडण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय

Rohan_P

जीवनदीप फौंडेशनतर्फे महावीर जयंतीनिमित्त मिठाई वितरण

Patil_p

मनपाकडून विनामास्क कारवाई सुरूच

Amit Kulkarni
error: Content is protected !!