तरुण भारत

कर्नाटकात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पोलिसांच्या मृत्यूचे प्रमाण घटले

बेंगळूर/प्रतिनिधी

कोरोनाची संख्या वाढत असताना राज्यातील पोलीस दल ‘कोरोना’ विरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. दरम्यान, कोरोनाच्या संकटात वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलीस अहोरात्र मेहनत घेत रस्त्यावर उभे आहेत. कोरोनाने पोलिसांनाही विळखा घातला आहे. कर्तव्य बजावताना पोलीस दलातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा पहिल्या लाटेत कोरोनामुळे जास्त पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान पहिल्या लाटेपेक्षा राज्यातील कोरोना संक्रमणाची दुसरी लाट राज्यातील पोलीस दलासाठी प्राणघातक नव्हती, अशी माहिती आहे. गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर दरम्यान कर्नाटकच्या १०४ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनाने बळी घेतला होता. तर दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ एप्रिल ते ८ जुलै या कालावधीत केवळ ६१ होती. संख्या कमी होण्याचे कारण म्हणजे लसीकरण असल्याचे म्हंटले जात आहे.

दरम्यान, देशात पहिल्या लाटेची तीव्रता कमी होते ना होते तोवर दुसरी लाट आली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता जास्त होती. यावेळी कोरोनाने अनेकांचा बळी गेला. दरम्यान, याच काळात केंद्र सरकारने लसीकरण सुरु केले. यावेळी पात्र लाभार्थ्यांना आणि प्रथमदर्शी कामगारांना लसीकरण सुरु झाले. यामध्ये पोलिसांचाही समावेश होता. लसीकरणामुळे राज्यातील पोलिसांना कोरोनाची लागण आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे बोलले जात आहे.

Advertisements

Related Stories

कत्ती, जोल्ले मंत्रिपदी कायम

Amit Kulkarni

गोहत्या बंदी कायद्याच्या अभ्यासासंबंधी पशुसंवर्धन मंत्री गुजरात, उत्तर प्रदेश दौऱ्यावर

Abhijeet Shinde

कर्नाटकात आणखी एक ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल

Abhijeet Shinde

कर्नाटक : १ डिसेंबरपासून वैद्यकीय महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याचा निर्णय

Abhijeet Shinde

लॉकडाऊन, कर्फ्यूही नाही; मात्र मास्क हवाच

Patil_p

मेकेदातू प्रकल्पाबाबत तडजोड नाही: मुख्यमंत्री बोम्माई

Abhijeet Shinde
error: Content is protected !!