तरुण भारत

ज्याला लोक “रामराज्य” समजतात ते खरं तर “रामभरोसे” राज्य: रुपाली चाकणकर

मुंबई/प्रतिनिधी

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या एका महिला उमेदवाराची साडी खेचण्याचा प्रकार घडल्यामुळे शुक्रवारपासून मोठा गदारोळ सुरू आहे. सर्वच विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. सोशल मीडियावर देखील योगी आदित्यनाथ सरकारवर नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांनी देखील ट्विटरवरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, याप्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत, “ज्याला लोक “रामराज्य” समजतात ते खरं तर “रामभरोसे” राज्य आहे. रामभरोसे राज्यात असलेल्या आंधळ्या सरकारमुळे तिथे कायदा आणि सुव्यवस्था नावालाही शिल्लक नाही. सीतेची ही हतबलता तिथे रोजचीच आहे,” योगी सरकारवर टीका केली आहे.

Advertisements

तसेच बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांनी देखील ट्विटरवरून कोणत्या तोंडानं ते स्वत:ला बाबा आणि योगी म्हणवतात? हा तर ढोंगीपणाचा कळस आहे. पोलिसाच्या वेषात इथे गुंड कायद्याचं रक्षण करत आहेत”, असा निशाणा साधला आहे.

Related Stories

हिमाचल प्रदेशात पशु चिकित्सा सहाय्यकांच्या 120 पदांची होणार भरती

Rohan_P

ऑलिम्पिकमधील यशातून प्रेरणा घ्या!

Patil_p

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, 5 ठार

Patil_p

डोक्यात फरशी घालून मुलाचा खुन

Abhijeet Shinde

“अमर, अकबर, अँथनी अशी यांची तीन तोंडं…”, मंत्री दानवेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Abhijeet Shinde

निर्वासितांच्या नावाखाली दहशतवाद्यांना आश्रय मिळू नये – राष्ट्राध्यक्ष पुतिन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!