तरुण भारत

आमदार रवी राणा यांची जीभ घसरली, मुख्यमंत्र्यांवर केली अक्षेपार्ह टीका

ऑनलाईन टीम / अमरावती : 


अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदार संघाचे अपक्ष आमदार रवी राणा हे सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत राहतात. मात्र आज एका फेसबुक लाईव्ह मध्ये बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच आक्षेपार्ह विधान केले आहे. 

Advertisements


आमदार रवी राणा फेसबुक लाईव्हद्वारे बोलत असताना एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना कशाप्रकारे संघर्ष करावा लागतो हे सांगत होते. त्या वेळी रवी राणा यांनी एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्निल लोणकर यांच्या आत्महत्याचे मुद्दा उपस्थित केला. राज्य सरकारने स्वप्निल लोणकर याच्या कुटुंबीयांना तात्काळ एक कोटी रुपयांची मदत अशी मागणी यावेळी राणा यांनी केली.


पुढे ते म्हणाले, गोरगरीब जनता शेतकरी व युवकांचे प्रश्न विचारणार्‍या बारा आमदारांना निलंबित करण्यात आले. स्वप्निल लोणकर या युवकाने फक्त एमपीएससी परीक्षा घेऊन सुद्धा मुलाखतीला न बोलावल्यामुळे आत्महत्या केली. या सरकारने लॉकडाऊनमध्ये केलेला भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे प्रश्न एमपीसी च्या विद्यार्थ्यांचे प्रश्न निकाली काढले नाही तर मातोश्री समोर जाऊन बेशरमचे झाड लावणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेसमोर संदेश जाईल आम्ही कितीही ओरडून ज्या माणसाला कळतच नाही, असा बे… मुख्यमंत्री मी आयुष्यात पहायला नाही. बेशरमचे झाड लावल्या मुळे त्यांना काहीना काही फरक पडेल व ते राज्यातील जनतेला दिलासा देतील, असे आक्षेपार्ह विधान आमदार रवी राणा यांनी केले आहे.

Related Stories

चिंताजनक : महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8641 नवे कोरोना रुग्ण; 266 मृत्यू

Rohan_P

कर्नाटक: बारावीचा निकाल जाहीर; २,२३९ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण

Abhijeet Shinde

कोरोनाचा उद्रेक : दिल्लीसह ‘या’ राज्यांमधील शाळा – कॉलेजेस आता पुन्हा बंद

Rohan_P

सातारा : शाळेत कोरोना प्रादुर्भाव झाल्यास मुख्याध्यापकांस जबाबदार धरू नये

Abhijeet Shinde

पाण्यात चाळण असल्याने ‘ते’ दोघे बुडाले

Abhijeet Shinde

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P
error: Content is protected !!