तरुण भारत

वकिलांसाठी लस मोहीम सुरूच

शनिवारीही 100 हून अधिक जणांना दिली लस

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

न्यायालयीन कामकाजाला सुरुवात झाल्यामुळे वकील कामाला लागले आहेत. कोरोना काळात वकिलांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. कोरोनाची अनेकांना लागण झाली, अनेकांचा मृत्यूदेखील झाला. त्यामुळे वकीलांना लस प्रथम द्यावी यासाठी बेळगाव बार असोसिएशन आणि कर्नाटक राज्य बार असोसिएशनचे सदस्य विनय मांगलेकर यांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत.

शनिवारी लस मोहीम राबविण्यात आली. जवळपास 100 हून अधिक जणांना लस देण्यात आली. वकील तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही लस देण्यात आली. काही जणांनी पहिली लस तर काही जणांनी दुसरी लसही घेतली. अत्यंत नियोजनबद्धरित्या गेल्या महिन्याभरापासून ही मोहीम राबविण्यात आली आहे.

यावेळी कर्नाटक राज्य बार असोसिएशनचे सदस्य ऍड. विनय मांगलेकर, बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. गजानन पाटील, जनरल सेपेटरी आर. सी. पाटील, जॉईंट सेपेटरी शिवपुत्र फटकळ, सदस्य ऍड. पी. के. पवार, सचिन शिवण्णावर, ऍड. मारुती कामाण्णाचे, ऍड. अमृत कोल्हटकर, ऍड. श्रीकांत पवार, ऍड. कमलकिशोर जोशी, सदस्य ऍड. कमलेश मायाण्णाचे यांच्यासह इतर वकील उपस्थित होते.

Related Stories

‘लोकमान्य अर्थवार्ता विशेष अंकाचे’ पुण्यामध्ये प्रकाशन

Omkar B

मुले आली, शाळा बहरल्या!

Amit Kulkarni

पोलीस आयुक्त कार्यालयाचा कोनशिला आठवडय़ाभरात

sachin_m

शिरसी संघाकडे फार्मा चषक

Amit Kulkarni

सिद्धीविनायक साप्ताहिक फंडातर्फे विविध स्पर्धा

Patil_p

विशेष रेल्वेमुळे प्रवाशांना बसतोय भुर्दंड

Amit Kulkarni
error: Content is protected !!