तरुण भारत

कोरोना संपल्याच्या भ्रमात वावरू नका!

जीनिव्हा / वृत्तसंस्था

कोरोनाच्या दुसऱया लाटेचा संसर्ग आता ओसरत चालला आहे. भारतासह अनेक देशांनी कोरोना रुग्णसंख्या कमी होताच नियम शिथिल केले आहेत. परिणामी गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी त्यात फारशी घट होताना दिसत नाही. ‘अनलॉक’नंतर बऱयाच भागात व्यवहार सुरू झाल्याने आणि लोक गर्दी करू लागल्याने संसर्ग वाढत असून रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. त्याच पार्श्वभुमीवर ‘कोरोना संपल्याच्या भ्रमात वावरू नका’ असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिला आहे.

Advertisements

कोरोना संसर्गाने मागील दीड वर्षांहून अधिक काळापासून जगभरात थैमान घातले आहे. भारतातही करोनाच्या दुसऱया लाटेत लाखो लोकांना आपला प्राण गमवावा लागला. देशातील दुसरी लाट आता काही प्रमाणात आटोक्मयात आली आहे. मात्र तिसरी लाट येण्याची शक्मयता आहे. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेने नियम पाळण्यासंबंधी महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Related Stories

हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या ट्रायलला बंदी : WHO

datta jadhav

‘या’ लसीबाबत संभ्रम कायम; अनेक देशात निर्बंध

datta jadhav

पाकिस्तानात हल्ला, 9 चिनी इंजिनियर्सचा मृत्यू

Patil_p

खनिज तेल उत्पादनात होणार कपात

prashant_c

अमेरिकेतील श्वेतवर्णीयांच्या संख्येत घट

Patil_p

अफगाणिस्तानच्या कंधार विमानतळावर हल्ला

Patil_p
error: Content is protected !!